Chief Minister Ayodhya Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसह येत्या ९ एप्रिलला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहे. तसेच यावेळी ते शरयू नदीची आरती देखील करणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची संयुक्त सभा पार पडली. या सभेच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी अयोध्येच्या दौऱ्याबाबतची माहितीही दिली.
एकनाथ शिंदे म्हणाले, ''अयोध्या आणि शिवसेनेचे अनेक वर्षांपासून एक नातं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच राममंदिराचं स्वप्न पूर्ण होत आहे. प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतल्यानंतर राम मंदिराच्या बांधकामाचीही मी पाहणी करणार आहे. अयोध्या आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. आम्ही याकडे राजकारण म्हणून कधी पाहिलं नाही आणि पाहणार देखील नाही'', असंही ते म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या 'वज्रमुठ' सभेवर 'वज्रझुठ' सभा आहे असं म्हणत जोरदार टीका केली. शिंदे म्हणाले, ''सत्तेला हपालेलली खोटारडी लोक एकत्र आली आहेत. सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांचा निषेध ते करणार का?'', असा सवालही यावेळी त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.