पुणे : तीन दिवसांपूर्वी आंबेडकरवादी नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्यानंतर आता ओबीसी चेहरा म्हणून ओळख असलेले लक्ष्मण हाके (Laxman Hake) हे शिवसेनेत (shivsena) प्रवेश करणार आहेत. आज (बुधवारी) ते शिवबंधन बांधणार आहेत. लक्ष्मण हाके यांचा शिवसेनेत आल्यामुळे शिवसेनेला एक आक्रमक ओबीसी आणि धनगर चेहरा मिळणार आहे. (Laxman Hake latest news)
शिवसेनेत बंड झाल्यानंतर शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकारी शिंदे गटात सहभागी होत आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेत जोरदार इन्कमिंग सुरू झाले आहे. आज दुपारी हाके यांची विनायक राऊत यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लक्ष्मण हाके शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
धनगर समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून हाके यांची ओळख आहे. हाके हे राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदाचा राजीनामा देणार आहे. मातोश्रीवर येऊन ते आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेकडून हाके यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
"शिवसेनेकडून ओबीसींना आरक्षण देण्यात वारंवार टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. सत्तेत असताना शिवसेनेला ओबीसींना आरक्षण देता आलं नाही, असाही शिवसेनेवर आरोप होत आहे. आता लक्ष्मण हाके यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेवरील हे आरोप खोडला जाईल का, हे लवकरच समजेल.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. शेकापचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव झाला. शिवसेनेकडून शहाजीबापू पाटील यांनी देशमुखांना पराभूत केलं. आता आगामी निवडणुकीत लक्ष्मण हाके विरुद्ध शहाजीबापू पाटील अशी सामना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लक्ष्मण हाके हे सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी एमए चं शिक्षण पूर्ण केलं आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात काही दिवस अध्यापनाचे कामही त्यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.