Ulhasnagar Politics : महापौरांच्या खुर्चीचा ‘रिमोट कंट्रोल’ कलानी महलमध्ये? ओमी कलानींच्या दाव्याने नवा राजकीय वाद

Omi Kalani : विकासकामे आणि राजकीय निर्णयांची सूत्रे महापालिका मुख्यालयातून नव्हे, तर ‘कलानी महल’मधून हलत असल्याची चर्चा आहे. ओमी कलानी यांनी केलेल्या दाव्याने त्याला पुष्टी मिळाली.
Omi Kalani making a statement about the political control of Ulhasnagar’s mayoral post.
Omi Kalani making a statement about the political control of Ulhasnagar’s mayoral post.sarkarnama
Published on
Updated on

नवनीत बऱ्हाटे

Omi Kalani News : महापौरांच्या खुर्चीवर अश्विनी निकम असल्या, तरी त्या खुर्चीच्या निर्णयांचा ‘रिमोट कंट्रोल’ कुणाच्या हातात आहे? उल्हासनगरच्या राजकारणात वर्षानुवर्षे प्रभाव राखणाऱ्या कलानी कुटुंबाबाबत सुरू असलेल्या या चर्चेला आता खुद्द युवा नेते ओमी कलानी यांच्या वक्तव्याने नवे वळण मिळाले आहे. “महापौर अश्विनी निकम शंभर टक्के माझ्या म्हणण्यानुसार काम करतात,” असा थेट दावा ओमी कलानी यांनी पत्रकारांशी बोलताना केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

त्यांच्या या वक्तव्यामुळे उल्हासनगर महापालिकेतील विकासकामे आणि राजकीय निर्णयांची सूत्रे महापालिका मुख्यालयातून नव्हे, तर ‘कलानी महल’मधून हलतात का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

गेल्या काही काळापासून ओमी कलानी शहराच्या राजकीय पटलावर फारसे सक्रिय दिसत नसल्याची चर्चा सुरू होती. यासंदर्भात विचारण्यात आले असता त्यांनी ही चर्चा स्पष्टपणे फेटाळली. “मी सक्रिय नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. महापालिकेतील महापौर अश्विनी निकम शंभर टक्के माझ्या म्हणण्यानुसार काम करतात. माझे वडील पप्पू कलानी दररोज सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत खासदार कार्यालयात नागरिकांसाठी उपलब्ध असतात आणि आमचे काम पूर्ण ताकदीने सुरू आहे,” असे ओमी कलानी यांनी म्हटले.

अश्विनी निकम या शहराच्या प्रथम नागरिक असून त्यांनी नुकतेच बीए एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा आणि कायद्याच्या ज्ञानाचा शहराच्या विकासासह महापालिकेच्या निर्णयप्रक्रियेत फायदा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ओमी कलानी यांच्या दाव्यामुळे महापौर स्वतंत्रपणे निर्णय घेतात की त्यांच्या निर्णयांवर कलानी कुटुंबाचा प्रभाव आहे, यावर आता राजकीय चर्चा रंगण्याची चिन्हे आहेत.

Omi Kalani making a statement about the political control of Ulhasnagar’s mayoral post.
Ulhasnagar Poltics : न्यायालयाच्या दणक्यानंतर निवडणुकीचा बिगुल, सात जागांसाठी रणधुमाळी; भाजपचा वरचष्मा, शिवसेनेला तीन जागा

कलानी कुटुंबाचा प्रभाव

उल्हासनगरच्या राजकारणावर कलानी कुटुंबाचा अनेक वर्षांपासून प्रभाव राहिला आहे. महापालिकेतील सत्तेच्या आणि विकासकामांच्या निर्णयांमध्येही त्यांचा प्रभाव असल्याचे आरोप विरोधकांकडून वेळोवेळी केले गेले आहेत. आता ओमी कलानी यांच्या या वक्तव्यामुळे त्या चर्चेला पुन्हा बळ मिळाले आहे.

Omi Kalani making a statement about the political control of Ulhasnagar’s mayoral post.
Political Drama : महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा : भाजपच्या नगरसेवकानंतर गटनेत्याचा कारनामा, थेट महापौरांच्या खुर्चीवरच केला कब्जा?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com