Omi Kalani News : निर्णय झाला पक्का; ओमी कलानी देणार लोकसभेला श्रीकांत शिंदेंना साथ

Ulhasnagar Politics : मात्र विधानसभेला कलानी स्वतंत्रपणे लढणार
Omi Kalani
Omi KalaniSarkarnama
Published on
Updated on

Ulhasnagar : उल्हासनगर येथील राजकारणात दबदबा असणारे कलानी कुटुंब नेमके कुठल्या पक्षात आहेत, अशी राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होती. मात्र, ओमी कलानी यांनी या सर्व चर्चांना सरकारनामाच्या प्रतिनिधीशी बोलताना पूर्णविराम दिला आहे. आमची टीम ओमी कलानी पक्ष आहे, असे सांगत लोकसभेला मात्र आमचे जवळचे मित्र असणाऱ्या श्रीकांत शिंदे यांना साथ देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर विधानसभेला मात्र माझ्या स्वतःच्या पक्षातून लढेन असे भाष्य त्यांनी केले.

पप्पू कलानी आता राजकीय निर्णय घेत नाही.

पप्पू कलानी यांचे वय होतं चालले आहे. त्यामुळे आता बरेच राजकीय निर्णय मी घेतो असे ओमी यांनी सांगितले. मात्र, आजूनही पूजा, लग्न समारंभ किंवा कोणाचा मृत्यू झाला असेल तर अशा ठिकाणी पप्पू कलानी स्वतः जातात असे त्यांनी नमूद केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभेत श्रीकांत शिंदेंना देणार साथ

माझे सर्वच राजकीय नेत्यांबरोबर चांगले संबंध आहेत. मी लोकसभेसाठी आमचे मित्र श्रीकांत यांना साथ देणार असा शब्द दिला आहे. त्यामुळे आता लोकसभेला मी श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा देणार असून सध्या उल्हासनगर महापालिकेत टीम ओमी कलानी यांचे 22 नगरसेवक आहेत. तर आजूबाजूच्या तीन ते चार गावात सरपंच आणि उपसरपंच आहेत. इतकेच नव्हे तर साधारण 80 हजार मतदार असून ही संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना सगळा पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Omi Kalani
Maratha Reservation : ठाण्यात मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणासाठी चार हजार 'प्रगणक' नियुक्त

भाजपने फसवल कलानींचा आरोप...

भाजपसोबत ज्यावेळी आम्ही गेलो त्यावेळी भाजपने विधानसभेचे तिकीट देणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी सांगितल्याप्रमाणे मला तिकीट दिले नाही. त्यामुळे मी नाराज झालो होतो. त्यानंतर मी पक्ष सोडला. त्यानंतर 'टीम ओमी कलानी' या नावाने मी पक्ष चालवत आहे. आता येणाऱ्या विधानसभेत 'टीम ओमी कलानी' अपक्ष म्हणूनच स्वतः निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अशी आहे पार्श्वभूमी

कलानी कुटुंब हे गेल्या चार दशकांपासून उल्हासनगरच्या राजकारणात सक्रिय आहेत. पप्पू कलानी हे काँग्रेस पक्षाचे नेते होते. याच पक्षातून त्यांनी उल्हासनगर पालिकेत अध्यक्ष पद आणि आमदारकी भूषविली. मात्र, त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमूळे त्यांना काँग्रेस पक्षातून काढून टाकण्यात आले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीशी हात मिळवणी केली. मात्र हाती काही लागत नाही हे पाहून त्यांनी पुन्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातून 2004 मध्ये आमदारकी लढवली आणि ते आमदार म्हणून निवडून आले. पुन्हा काही कालांतराने त्यांनी राष्ट्रवादी पक्षाशी हातमिळवणी केली. मात्र त्यांच्यावर २०१३ मध्ये इंदर भटीजा यांच्या खून खटल्या प्रकरणी न्यायालयात गुन्हा सिद्ध झाला. त्यांना जेलमध्ये जाण्याची वेळ आली. यावेळी त्यांचा पुत्र ओमी कलानी यांनी भाजपची वाट पकडली त्यानंतर त्यांना पॅरोलवर सोडण्यात आले. मात्र त्यानंतरही ओमी कलानी यांनी पप्पू कलानी हे कायमचे बाहेर असल्याचे सांगत मोठा गौप्य स्फोट केला होता.

Edited By : Rashmi Mane

Omi Kalani
Sharad Pawar ED Enquiry : रोहितदादा ED कार्यालयात, तर शरद पवार मैदानात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com