Operation Lotus : कसं... नाना म्हणतील तसं...,भाजपला रोखणाऱ्या ठाकूरांचा गेम राजीव पाटील फिरवणार?

Operation Lotus Vasai Virar Mahapalika Hitendra Thakur : वसई विरार महापालिकेत सत्ता आणण्यासाठी भाजप ऑपरेशन लोटस करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
Operation Lotus Vasai Virar Mahapalika Hitendra Thakur
Operation Lotus Vasai Virar Mahapalika Hitendra Thakursarkarnama
Published on
Updated on

Vasai Virar Mahapalika : महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या हातात तिसऱ्यांदा सत्ता आली आहे. मात्र, 1 नगरसेवकावरून तब्बल 44 जागा मिळवणाऱ्या भाजपच्या कामगिरीची चर्चा देखील जोरात आहेत. त्यातच 'ऑपरेशन लोटस'द्वार हितेंद्र ठाकूरांना धक्का भाजपचे प्रयत्न केले जात असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे.

या चर्चेनंतर लगेचच नालासोपाऱ्यात 'कसं, नाना म्हणतील तसं', असा आशय असलेला बॅनर झळकला आहे. त्यातच राजकारणात काहीही होऊ शकते, असे सूचक विधान भाजपच्या मनोज बारोट यांनी केल्याने राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

वसई–विरार महापालिकेच्या अतिशय चुरशीच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने मित्र पक्षांच्या मदतीने ७१ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर भाजपने ४३ आणि शिंदे गटाने १ जागा जिंकली आहे. बविआला सत्ता स्थापनेचे स्पष्ट कौल मिळाला आहे. तर महायुतीला सत्ता स्थापनेसाठी अजून १६ नगरसेवकींची गरज आहे.

यापार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून वसईत ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून बविआचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या र्चेवर बविआचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी टीका केली आहे. असले धंदे करू नका. नाहीतर लोक शेण घालतील. जनतेने आधीच तुम्हाला धडा शिकवला आहे. माझा एकही नगरसेवक फुटणार नाही,” असा ठाम विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

Operation Lotus Vasai Virar Mahapalika Hitendra Thakur
Zilla Parishad Elections : ऐन रणधुमाळीत भाजपला कोंडीत टाकणारा काँग्रेसचा निर्णय, स्वाभिमानीशी गट्टी करत युती घोषणा; शिरोळचे राजकीय गणितं बदलणार?

यालाच अनुसरून भाजपने ऑपरेशन नाही.जनतेचा विश्वास असे पोस्टर लावून बविआला डिचवण्याचा प्रयत्न केला आहे. या चर्चेमुळे वसई–विरारचं राजकारण सध्या चांगलेच तापले असताना आणखी एका पोस्टरने ही चर्चा अधिकच रंगतदार बनली आहे.

सध्या बविआपासून अंतर ठेऊन असलेले माजी महापौर राजीव पाटील यांच्या भूमिकेबद्दलही वसईकरांमध्ये उत्सुकता आहे. यापार्श्वभूमीवर नालासोपाऱ्यातील सेंट्रल पार्क परिसरात, कसं, नाना म्हणतील तसं, अशा आशयाच्या लागलेल्या एका बॅनरने ऑपरेशन लोट्सची चर्चा अधिकच रंगू लागली आहे. हे पोस्टर कुणी लावले, याबद्दल अधिक माहिती कुणाकडेही नसल्याने संभ्रम मात्र निर्माण झाला आहे.

Operation Lotus Vasai Virar Mahapalika Hitendra Thakur
TET exam result news : TET परीक्षेचा धक्कादायक निकाल; विद्यार्थ्यांना शिकवणारे 'मास्तर' नापास?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com