MLA Ravindra Waikar: दसरा मेळाव्याआधीच ठाकरेंच्या आमदाराची पत्नी चौकशीच्या फेऱ्यात

ShivSena Dasara Melava : शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात विचारांचे सोने लुटण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल होणार आहेत.
Uddhav Thackeray and Ravindra Waikar
Uddhav Thackeray and Ravindra WaikarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला घेरण्यासाठी शिवतीर्थावर ऐतिहासिक गर्दी जमावण्याचा चंग बांधलेल्या शिवसेनेच्या (ठाकरेंच्या) उरल्या सुरल्या आमदारांच्या मागे ऐन दसऱ्याच्या आदल्यादिवशीच तपास यंत्रणांची चौकशीची साडेसाती लागली आहे.

ठाकरे गटाचे नेते, आमदार रवींद्र वायकर यांची 500 कोटींच्या कथित हॉटेल घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून सोमवारी तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली. यानंतर आता रवींद्र वायकर यांच्या पत्नीचीही चौकशी होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray and Ravindra Waikar
CM Shinde Dasara Rally: मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यासाठी लोक जाईनात, दोनशेपैकी साठ बस रद्द; ज्या गेल्या त्याही रिकाम्या

शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात विचारांचे सोने लुटण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल होणार आहेत. तर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर होणाऱ्या दोन्हीही दसरा मेळाव्याबाबत मोठी उत्सुकता आहे. पण ऐन दसऱ्याच्या आधीच एक दिवस ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची चौकशी झाली.

तर आता त्यांच्या पत्नीलाही चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले आहे. त्यामुळे या प्रकरणावर दसरा मेळाव्यात आमदार काही बोलणार का ? की फक्त उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तसेच उद्धव ठाकरे स्वत: यावर काय भाष्य करतात, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

Uddhav Thackeray and Ravindra Waikar
Ravindra Waikar News: रवींद्र वायकरांची आर्थिक गुन्हे शाखेकडून सहा तास चौकशी; बाहेर येताच दिली 'ही' प्रतिक्रिया

वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले असून येत्या बुधवारी चौकशीला हजर राहाण्याचे सांगण्यात आले आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून ठाकरेंच्या अनेक आमदारांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. मात्र, आता तपास यंत्रणांनी आमदारांच्या कुटुंबीयाकडेही मोर्चा वळवल्याचे चित्र या निमित्ताने दिसून येत आहे.

नेमकं प्रकरण काय ?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आमदार वायकर यांच्याविरोधात तब्बल 500 कोटींच्या कथित हॉटेल घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती. जोगेश्वरी येथील हॉटेल प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर वायकर यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी वायकरांना कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.

याच प्रकरणासंदर्भात रवींद्र वायकरांची आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी तब्बल सहा तास चौकशी केली. वायकरांची चौकशी झाल्यानंतर त्यांना दिलासा मिळेल, असे अनेकांना वाटत होते, मात्र, ऐन दसऱ्यांच्या आधीच वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आले. त्यामुळे आमदार वायकरांना धक्का बसला. आता या प्रकरणात आणखी काय माहिती समोर येते, तसेच आणखी कुणाची चौकशी होतेय का? हे पाहणेही महत्वाचे असणार आहे.

Edited by Ganesh Thombare

Uddhav Thackeray and Ravindra Waikar
PM Modi Shirdi Visit: मोदींच्या दौऱ्याच्या नियोजनात निरुत्साह; मंत्री विखेंनी भर बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांना झापले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com