Bail Rejects : आमदार पुत्रासह शिवसेना पदाधिकाऱ्यांची दिवाळी न्यायालयीन कोठडीत, ११ जणांचा जामीन अर्ज फेटाळला!

Palghar Hospital Shivsena : आमदारपुत्र रोहित गावीतसह एकुण 11 जणांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता पुढील सुनावणी 19 नोव्हेंबरला होणार आहे.
Palghar medical bill dispute hospital staff assault
Palghar medical bill dispute hospital staff assaultsarkarnama
Published on: 
Updated on: 

निखिल मेस्त्री

Shivsena News : दहीहंडी उत्सवादरम्यान पालघर येथील रिलीफ रुग्णालयात झालेल्या राडा प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या ११ संशयित आरोपींचे जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुजाता बांदल यांनी शनिवारी (ता. ७) फेटाळले. सरकारी पक्ष आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला.

या निर्णयामुळे या प्रकरणातील शिवसेनेचे पालघरचे निलंबित जिल्हाप्रमुख कुंदन संखे, शहर प्रमुख राहुल घरत, युवा सेना प्रमुख साईराज पाटील, आमदारपुत्र रोहित गावीत, ऋषभ वारे, राहुल संखे, शुभम बांदिवडेकर सह नगरसेवक नीलम संखे, सदस्य मनोज घरत या पदाधिकाऱ्यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम कायम राहणार आहे.

दहीहंडी उत्सवादरम्यान गोविंदा पथकातील जखमी सदस्याच्या उपचारावरून ५ सप्टेंबर रोजी रिलीफ रुग्णालयात वाद झाला होता. यावेळी शिवसेनेचे तत्कालीन पदाधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णालयात गोंधळ घालत डॉक्टर व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच रुग्णालयातील कर्मचारी विवेक झिंगा यांना मारहाण करण्यात आल्याची तक्रारही करण्यात आली होती. या घटनेनंतर पालघर पोलिस ठाण्यात १० शिवसेना नामनिर्देशित पदाधिकारीसह सात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींना अटक केली. राहुल घरत याला सुरुवातीला अटक करण्यात आली. त्यानंतर आमदारपुत्र रोहित गावित याच्यासह कुंदन संखे, साईराज पाटील,मनीष ऊर्फ विकी संखे, ऋषभ वारे, शुभम बांदिवडेकर, राहुल संखे,नगरसेवक नीलम संखे, सदस्य मनोज घरत आणि कुंदन संखे यांचा वाहचालक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Palghar medical bill dispute hospital staff assault
BJP Politics In Shirur : शिरूरमध्ये विरोधकांचा 'गेम ओव्हर'! भाजप सत्तेत, सत्तेची दोन्ही महत्त्वाची पदे पाचर्णे कुटुंबाकडे; नगरपरिषदेत विरोधकच उरला नाही

तपासादरम्यान अज्ञात व्यक्तींची ओळख पटवून या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढली. पोलिसांनी या प्रकरणात एकूण २३ जणांना अटक केली होती.

१९ नोव्हेंबरला सुनावणी

दरम्यान या प्रकरणातील अकरा गोविंदा आणि एका कॅमेरामनला गेल्या काही दिवसआधी जामीन मंजूर झाला आहे. उर्वरित अकरा जणांच्या जामीन अर्जांवर न्यायालयात दोन दिवस सरकारी वकिलांनी आणि बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. शुक्रवारी निर्णय अपेक्षित असताना अर्जांची संख्या अधिक असल्याने न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. अखेर शनिवारी न्यायालयाने ११ जणांचे जामीन अर्ज फेटाळले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Palghar medical bill dispute hospital staff assault
BJP challenges Congress : निलंग्यात पुन्हा भाऊबंदकी आमने-सामने; लातूर डीसीसी बँकेसाठी काकीविरुद्ध पुतण्या लढत रंगणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.