Palghar Loksabha News : पालघरमध्ये जिजाऊ संघटनेने उमेदवार जाहीर केल्याने आता होणार चौरंगी लढत!

Palghar Lok Sabha Constituency : महायुतीचा तिढा सुटेना, तर बहुजन विकास आघाडीचा उमेदवारही अद्याप गुलदस्त्यातच!
Palghar Lok Sabha Constituency
Palghar Lok Sabha ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : पालघर लोकसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत होणार आहे. कारण, जिजाऊ संघटनेने पालघरमध्ये आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांनी पालघर मधून कल्पेश भावर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने आधीच उमेदवार जाहीर केला आहे.

याशिवाय महायुतीचा उमेदवारीबाबतचा तिढा सुटलेला नाही, तर बहुजन विकास आघाडीचा उमेदवारही अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र या दोघांकडूनही उमेदवार जाहीर केला जाणार आहे. त्यामुळेच पालघरमध्य आता चौरंगील लढत पाहायाल मिळणार असल्याचं दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Palghar Lok Sabha Constituency
Loksabha Election 2024 : पालघर लोकसभा मतदारसंघात 'कहानी मै Tweest' ; जिजाऊ संघटनेकडून उमेदवार जाहीर!

पालघर लोकसभेसाठी ठाकरे गटाने पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भारती कामडी यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर होताच भारती कामडी आणि ठाकरे(Uddhav Thackeray) गटाचे नेते व कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत. त्यामुळे पालघरमध्ये प्रचारात ठाकरे गटाची आघाडी असल्याचे दिसून येत आहे. 

तर येथे विद्यमान खासदार हे शिवसेनेचे(Shivsena) राजेंद्र गावीत आहेत. मात्र, यावेळी या जागेवर भाजपने दावा केला आहे. शिवसेना आणि भाजपच्या परस्पर विरोधी दाव्याने, या जागेचा आणि उमेदवारीचा तिढा कायम आहे. मात्र, आपणांस वरिष्ठांनी आदेश दिल्याचे सांगत, राजेंद्र गावीत यांनी एकतर्फी प्रचार सुरु केला आहे. परंतु कोणत्या पक्षाकडून उमेदवारी आणि चिन्ह काय असणार आहे? हे अद्याप गुपीतच आहे. गावीत यांच्या उमेदवारीला भाजप जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे येथून महायुतीकडून कोण उमेदवार असणार आहे, याचीही सर्वांना उत्सुकता आहे.

Palghar Lok Sabha Constituency
Palghar Loksabha News : एकनाथ शिंदेंचा खासदार ‘कमळा’वर लढणार? भाजप प्रवेशाचीही चर्चा...

  दुसरीकडे पालघर लोकसभेची पहिली निवडणूक जिंकलेल्या आणि जिल्ह्यात तीन विधानसभेवर वर्चस्व असणाऱ्या बहुजन विकास आघाडीने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे आमदार हितेंद्र ठाकुर यांनी जाहीर केले आहे. मात्र, त्यांनी उमेदवार गुलदस्त्यातच ठेवला आहे.

   महायुतीचा तिढा कायम असतांना, पालघरसह ((Palghar Lok Sabha Constituency) कोकण विभागात अल्पावधीत, गाव पाड्यांमध्ये पोहोचलेल्या नीलेश सांबरेंच्या जिजाऊ सामाजिक संघटनेने या निवडणुकीत पालघर आणि भिवंडीची जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भिवंडीत स्वतः निलेश सांबरे तर पालघर मध्ये कल्पेश भावर यांची उमेदवारी जाहीर करून, सांबरे यांनी प्रस्थापित पक्षांपुढे आव्हान उभे केले आहे. त्यांनी जिल्ह्यातील समस्या तसेच जटील प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मतदारांना दिले आहे. 

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com