Prakash Ambedkar : पंतप्रधान मोदी तपास यंत्रणांचा गैरवापर करत नाहीत : आंबेडकरांनी प्रमाणपत्र का दिलं?

Prakash Ambedkar : मी मोदींच्या जागी असतो तर मी ही तेच केलं असतं.
Prakash Ambedkar :
Prakash Ambedkar :Sarkarnama

Prakash Ambedkar : 'पंतप्रधान मोदी हे तपास यंत्रणांचा गैरवापर करत नाहीत," असं आश्चर्यकारक विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. "ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांचा गैरवापर होत नाही. मोदींच्या जागी मी असतो तरी मी ही असाच वागलो असतो," असेही ते म्हणाले आहेत. यामुळे शिवसेना ठाकरे गटाशी युती केल्यानंतर त्यांच्या या प्रकारच्या विधानांमुळे आता आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Prakash Ambedkar :
Amit Shaha News : अमित शाह दक्षिण दिग्विजयावर : काँग्रेस शह देणार का?

"मी नरेंद्र मोदी असतो तर मी ही तेच केलं असतं. या कायदेशीर कारवाया आहेत, यात बेकायदेशीर काहीच नाही. मला आणि माझ्या पक्षाला वाचवायचं असेल तर यासाठी जे जे कायदेशीर मार्ग आहेत. त्या त्या कायद्याची आयुधे मी वापरणार. आज मला चाळीस वर्षे झाली राजकारणात आहे. तुम्ही स्वच्छ असाल तर तुम्ही समोरच्याला आव्हान देऊ शकता. पण तुम्ही तसे नसाल तर काहीच करता येणार नाही, असेही आंबेडकर म्हणाले.

Prakash Ambedkar :
BJP News : प्रकाश आंबेडकर लहान डोक्याचे, असं बावनकुळे का म्हणाले..

"मी जर उद्या मोदी असेन, तर मी ही मोदी जे करतात, तेच मी करेन. मी कशाला माझी खुर्ची घालवू. लोकशाहीमध्ये मला माझी खुर्ची कायदेशीर मार्गाने वाचवता येत असेल, तर ते वापरण्यात येणार. मोदींनी बेकायदेशीर असं काही केलं नाही. तुम्ही कायदेशीर मार्गाला काही करूच शकत नाही,' असे आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, ठाकरे गटाशी युती झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी युती विपरित विधाने करण्याचा सपाटा लावला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना 'कोण संजय राऊत?' म्हणत डिवचले होते. तर महाविकास आघाडी अस्तित्त्वात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिकेत राहिलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली होती.

आता त्यांनी विरोधकांकडून होणाऱ्या तपास यंत्रणांबाबत गैरवापराच्या आरोपात थेट पंतप्रधान मोदींना क्लिनचीट देवून महाविकास आघाडीचे व ठाकरे गटाचे टेंशन वाढवले आहे. यामुळे आंबेडकर यांना युती टिकवायची आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com