
मुंबई : पोलिसांच्या बदली प्रकरणाबाबत राज्य सरकारचे मुख्य सल्लागार सीताराम कुंटेंनी (Sitaram kunte) धक्कादायक खुलासे केले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (parambir singh) यांनी जुलै २०२० मध्ये १० डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मात्र अचानक हा आदेश रद्द करून त्यात बदल करण्यात आले. याबाबत ईडीने (ED) महाराष्ट्र सरकारचे प्रमुख सल्लागार सीताराम कुंटे यांना विचारणा केली असता त्यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. (Sitaram kunte News)
''मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कॉल केला होता. त्यांच्याकडे या बदल्या आणि नियुक्त्यांबाबत काही तक्रारी आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी मला पोलिस आयुक्तांना ते आहेत त्याच ठिकाणी ठेवण्यास सांगितले. त्यानंतर मी पोलिस आयुक्तांनाही याबाबत माहिती दिली. तक्रारींचे नेमके स्वरूप किंवा या प्रकरणातील पुढील घडामोडींबाबत मला माहिती नाही, असे कुंटे यांनी सांगितले.
तसेच, 10 डीसीपींच्या सुधारित बदलीचे आदेश जारी करण्यासाठी दिलेले निकषही माहित नाहीत. कारण ते पोलिस आयुक्तांनी ते त्यांच्या स्तरावर जारी केले होते, कदाचित पोलिस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना कळवले असेल आणि त्यांच्याकडून पुढील सूचना मिळाल्या असतील, पण त्या सूचना काय होत्या, पण याबाबत मला माहीत नाही.
या यादीतील नावे अंतिम यादीत होती का? असा सवाल इडीने विचारला असता सीताराम कुंटे यांनी सांगितले की, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil deshmukh) यांनी त्यांना पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत दिलेल्या यादीतून बहुतांश लोकांची नावे अंतिम यादीत होती. अनिल देशमुख यांच्याकडून त्यांना मिळालेली यादी पोलीस व्यवस्थापन मंडळासमोर ठेवण्यात आली होती. त्यानंतर ज्यांची नावे यादीत आली त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. हस्तांतरणाबाबत केलेल्या नियमानुसार कोणी बरोबर असेल तर त्याचे नाव अंतिम यादीत टाकले जायचे. अनिल देशमुख यांनी दिलेल्या यादीत बहुतांश लोकांची नावे अंतिम यादीत होती.
बदलीबाबत आतापर्यंत 28 वेळा बैठक झाली. अनिल देशमुख गृहमंत्री असताना पोलीस बदलीसंदर्भात २८ बैठका घेतल्या. त्यात २७ बदलीचे आदेश काढण्यात आले. फक्त एका यादीचा आदेश काढण्यात आला नाही कारण त्याला मान्यता नव्हती. या सर्व बैठकांच्या वेळी अनिल देशमुख उपस्थित होते. असेही सीताराम कुंठे यांनी ED चौकशीत सांगितले.
अनिल देशमुख यांची कोणतीही नोंद नसताना तुम्ही त्यांची अनधिकृत यादी का घेतली, असा सवाल ईडीने विचारला. 'गृहमंत्र्यांचे आदेश ऐकणे माझं कामचं आहे. त्यामुळेच मी त्यांच्याकडून यादी घ्यायचो, मी त्यांना नकार देऊ शकत नाही. अनिल देशमुखांनी मला अशी कोऱ्या कागदावर स्वाक्षरी नसलेली पोलिस अधिकाऱ्यांची यादी का? दिली हे मी सांगू शकत नाही, याबाबत तेच सांगू शकतील, असे उत्तर सीताराम कुंठे यांनी दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.