Maharashtra Political News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्याने शिंदे गटातील आमदारांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देऊ नका, अशीही मागणी ते करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपकडे असलेली अतिरिक्त जबाबदारी देणार असल्याचेही शिंदे गटाचे आमदार बोलत होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना आता खातेवाटप झाले आहे. यात शिंदे गटाला दणका बसणार असल्याचे दिसत आहे. (Latest Political News)
राज्य सरकारमध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना आज शुक्रवारी (ता. १४) खातेवाटप करण्यात आले. यात अजित पवार यांना अर्थखाते देण्यात आले आहे. तर धनंजय मुंडे यांना कृषीखाते मिळाले आहे. यापूर्वी कृषीखाते शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे होते. हे महत्वाचे मंत्रालय गेल्याने शिंदे गटाला दणका मानला जात आहे. कृषीमंत्रालय काढून घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, शिंदे गटातील काही मंत्र्यांच्या कामगिरीवर भाजपचे वरिष्ठ नेते नाराज होते. त्यांना डच्चू देणार असल्याचे बोलले जात होते. यात तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचाही समावेश होता. मात्र त्यांच्याकडून कृषीखाते काढून घेत दुसऱ्या मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. हा बदल वगळता इतर कुठलाही मोठा बदल आताच्या खातेवाटपात झालेला नाही. यानंतर सत्तारांचे मंत्रिपद साबूत राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे मंत्री अब्दुल सत्तारांना बसणारा 'जोर का झटका धीरे से' बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, अब्दुल सत्तार यांची २०१४ मध्ये निवडणुकीत माहिती लपवल्याप्रकरणी अडचणी वाढल्या आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिल्लोड न्यायालयाच्या तपासातून ही माहिती पुढे आली. सत्तार यांनी २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत सत्तार यांनी मालमत्तेची खोटी माहिती निवडणूक आयोगाला दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. यानंतर आज त्यांच्याकडील कृषीखाते काढून घेत त्यांना अल्पसंख्याक मंत्रीपद दिले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.