

Meenakshi Shinde News : ठाण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखाप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात माजी महापौर, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्या मीनाक्षी शिंदे यांचे नाव आरोपपत्रात दाखल करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली होती. आदित्य ठाकरे, संजय राऊत हे स्वतः पोलिस ठाण्यात बसून होते. अखेर पुरवणी आरोपपत्रात मीनाक्षी शिंदे यांचे नाव समाविष्ट करण्यात आले.
पूर्णेकर हत्या प्रकरणात आरोप होत असताना मीनाक्षी शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत घेत सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच दिशा सालियान प्रकरणाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर प्रहार करत त्यांच्या अटकेची मागणी केली.
शिंदे म्हणाल्या, 'पुरावे नसताना फक्त एका महिलेला गोवण्यासाठी प्रयत्न चालू आहे.का तर ती शिंदे गटात आहे म्हणून हे प्रयत्न होते. दिशा सालियन प्रकरणात सहा वेळा आदित्य ठाकरेंचे नाव जबाबपत्रात आहे. पाच वेळा उद्धव ठाकरेंचे नाव आहे.'
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, 'माझा संजय राऊतला प्रश्न आहे. दिशाची हत्या झाल्यानंतर त्यामध्ये आदित्य ठाकरेच, त्याच गँगवर आरोप होता. आदित्य ठाकरेला अटक करा म्हणून मागणी का केली नाही.'
'उद्या तुम्हावर कोणावर ही आरोप कराल, याच्यासाठी पुरावे द्यावे लागतात. पुरावे नसताना हे आरोप करणे हे राजकारण आहे, याची चौकशी झाली पाहिजे. हत्येनंतर मी पुढे येऊन दोन दिवस काही बोलले नाही, हा संवेदनशील विषय आहे. पोलिस या प्रकरणात चौकशी करत आहोत, आम्ही त्यांना सहकार्य करत आहोत. माझ्या पतीची, माझी चौकशी होणार आहे. त्याला आम्ही सामोरे जाऊ.', असे देखील त्यांनी सांगितले.
पूर्णेकरांच्या हत्येनंतर फरार झालेल्या दोन प्रमुख आरोपींना अखेर पोलिसांनी महाराष्ट्र-गोवा सीमेवरून ताब्यात घेतले आहे. निखिल यादव आणि नितेश पवार उर्फ ‘भावड्या’ अशी या आरोपींची नावे आहेत. पोलीस उपआयुक्त अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.