Prakash Ambedkar : अध्यक्षांनी फक्त औपचारिकता पार पाडली; आंबेडकरांचे निकालावर सूचक विधान

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंबद्दल आंबेडकरांनी व्यक्त केली सहानुभूती !
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Shivsena MLA Disqualification News : गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या जनतेला आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाची उत्सुकता लागली होती. आज राहुल नार्वेकरांनी अखेर शिंदेंच्या शिवसेनेच्या बाजूने निकाल दिला. यामुळे ठाकरेंचे मित्रपक्षाचे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी निकालावर खंत व्यक्त केली आहे.

निकालानंतर ॲड. प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरच्या माध्यमातून ठाकरेंप्रती सहानुभूती व्यक्त केली आगे. ते म्हणाले, 'विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला आहे. या निकामुळे युतीमधील आमचे मित्रपक्ष उध्दव ठाकरेंना धक्का बसला आहे. अपेक्षा होती की खरा निकाल लागेल मात्र, खरा निकाल लागला नाही. उद्धव ठाकरे यांच्याप्रती आम्ही सहानुभूती व्यक्त करतो.'

Prakash Ambedkar
Eknath Shinde : निकालाचे टेन्शन अन् धावता दौरा; तरी मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना सुखद धक्का

यावेळी आंबेडकरांनी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंना दिले त्याचवेळी निकाल लागल्याचा खुलासाही केला. याबाबत ते म्हणाले, ज्या दिवशी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत नाव आणि चिन्ह कायम ठेवण्याची परवानगी दिली, त्याच दिवशी ठाकरेंच्या पक्षाची हार झाली होती. त्याची आज फक्त औपचारिकता पूर्ण झाली, असेही त्यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधात एकत्र लढणार असल्याचेही आंबेडकरांनी स्पष्ट केले. निकाल काहीही लागला असला, तरी ह्या प्रवृत्तीविषयी आपण मिळून लढू, असे आंबेडकारांनी उद्धव ठाकरेंना आवाहन केले आहे. यामुळे लोकसभेपूर्वीच महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला स्थान मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

दरम्यान, खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार मलाच आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देताना म्हणाले. 'शिवसेनेची ही घटनाच सांगते की, त्यात कशी पद रचना आहे. त्यानुसारच खरी शिवसेना कुणाची आहे? याचा निर्णय घेतला आहे. 21 जून 2022 ला शिवसेनेत दोन गट पडले. सगळे पुरावे, साक्षी यांचा विचार करता मी शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, ही मान्यता देतो,' असे नार्वेकरांनी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

Prakash Ambedkar
Uddhav Thackeray : हे 'उबाठा' काय आहे...? उद्धव ठाकरे पत्रकारावर चांगलेच भडकले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com