Uddhav Thackeray : हे 'उबाठा' काय आहे...? उद्धव ठाकरे पत्रकारावर चांगलेच भडकले

Shivsena UBT : आगामी निवडणुकीसाठी तयार असल्याचा ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Shivsena MLA Disqualification News : सत्तासंघर्षाच्या महानिकालात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पिछेहाट झाली तर खरी शिवसेना ही मुख्यमंत्री असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिला. यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी ठाकरेंना शिवसेना 'उबाठा' पक्षावर निवडणूक लढवणार का, असा प्रश्न केला. यावर ठाकरे चांगलेच भडकल्याचे दिसून आले.

नार्वेकरांनी शिवसेनेत 2018 मध्ये केलेली घटना दुरुस्ती अमान्य केली. तसेच उलट तपासणीला गैरहजर राहिल्याने ठाकरे गटाचे प्रतिज्ञापत्रही फेटाळले. शिवसेनेच्या घटनेनुसार एकट्या ठाकरेंना कुणाचाही पक्षातून हाकालपट्टी करता येणार नाही, याकडेही नार्वेकरांनी लक्ष वेधत खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निर्णय दिला.

Uddhav Thackeray
Sharad Pawar : शरद पवारांनी थेट मुद्द्यालाच हात घातला; नार्वेकरांनी दिलेला निकाल चुकीचा ठरवला

या निकालामुळे उद्धव ठाकरेंना खरा पक्ष आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह परत मिळले दुरापस्त झाले आहे. तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी ठाकरेंना, तुम्ही उबाठा या पक्षाच्या नावावर निवडणूक लढवणार का, असा प्रश्न केला. यावर उत्तर देताना ठाकरे भलतेच संतापल्याचे पाहायला मिळाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी निवडणुका उबाठा नावाने लढवणार का? असा प्रश्न पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, 'उबाठा कशाला? माझे सरळ नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. हे 'उबाठा' काय आहे? इतरांच्या आई-वडिलांचीही नावे तुम्ही तशीच लावता का? असा प्रतिप्रश्नही ठाकरेंनी यावेळी केला.'

यानंतर 'उबाठा' या शब्दाचा अर्थही त्यांनी सांगून टाकला. ते म्हणाले, 'उबाठा असेल तर या अन्यायाविरोधात मी उभा ठाकलेला आहे,' असे त्यांनी निक्षून सांगत आगामी निवडणुकीसाठी तयार असल्याचा इशाराही सत्ताधारी पक्षांना दिला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसबाबत अध्यक्ष शरद पवारांनी नार्वेकरांनी आज दिलेला निकाल इतर पक्षांनाही लागू होत असल्याचे सूचक वक्तव्य केले. या निकालाबाबत काही प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत. पवार म्हणाले, आजच्या निकालाने उद्धव ठाकरेंची मशाल मोकळी झाली आहे. मात्र लोकांना खरी शिवसेना ठाकरेंचीच आहे, हे माहीत आहे. दोन दिवसांपूर्वी अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटल्याने निकाल काय असेल, याचा सर्वांना अंदाज होताच. आता इतरांच्या बाबतीतही असाच निकाल येण्याची शक्यता आहे.'

(Edited by Sunil Dhumal)

Uddhav Thackeray
Sharad Pawar On Rahul Narwekar : निकालानंतर शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला; म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com