Prakash Ambedkar : भाजपला रोखण्याचा प्रकाश आंबेडकरांनी सांगितला 'प्लॅन'

MVA : महाआघाडीत आमची जायची तयारी, समोरून प्रतिसाद नसल्याचं वक्तव्य
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Prakash Ambedkar vs BJP : काँग्रेस, राष्ट्रवादी, आणि शिवसेना ही निवडणुकीपूर्वी झालेली आघाडी नाही. तर निवडणूक झाल्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी तयार केलेली आघाडी आहे. आमची आगामी निवडणूक समोर ठेवून युती होतेय.

आता निवडणूक समोर ठेवून आघाडी होत आहे. त्यासाठी मागे जे काही घडले ते सोडले पाहिजे. आघाडी झाली तर आम्ही सहज जिंकू. मोदी, भाजप ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट नाही, असं म्हणत वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला रोखण्याचा फॉर्म्युला सांगून जिंकण्याचं गणितच मांडले.

Prakash Ambedkar
Mla Shrikant Bhartiya : फडणवीसांच्या खास आमदारावर भाजपची 2024 ची जबाबदारी; नाशिकच्या कार्यकारिणीत निर्णय

Vanchit वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बोलत होते. यावेळी त्यांनी आघाडीबाबत मते व्यक्त केली. आंबेडकर म्हणाले की, यापूर्वीची वक्तव्ये करायला नको होती, असे कोणी म्हणत असेल तर प्रामाणिकपणाचा कोठेतरी अभाव आहे. त्यावरून आघाडीत प्रवेश नाकारायला नको.

२०१९ ला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जायला तयार होतो. पण त्यांनीच नाकारलं. आताही माझ्याकडून नकार नाही सोमोरूनच येतोय. दरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये (MVA) घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Prakash Ambedkar
Konkan News : गुहागरमध्ये मला पाडण्याचा आदेश ‘मातोश्री’तूनच देण्यात आला : रामदास कदमांचा ठाकरेंवर गंभीर आरोप

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, "२०१९ मध्ये आम्हीच काँग्रेस तसेच राष्ट्रवादीसोबत जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी आम्हाला नाकारलं. त्यांच्यामुळे आम्हाला मिळणारी मुस्लिम मते फुटली. परिणामी आमंच नुकसान झाले. याबाबत त्यांनाच प्रश्न विचारालयला हवेत. मी ज्या आघाडीसोबत जाईल, तसेच ती आघाडी माझ्यासोबत प्रामाणिक राहिली, तर माझ्यासमोर नरेंद्र मोदी आणि भाजप फार मोठी गोष्ट नाही," असा विश्वासच आंबेडकर यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी भाजपला रोखण्याचा प्लॅन सांगितला.

Prakash Ambedkar
Abdul Sattar News : नगर परिषदेच्या विरोधात भाजपने आधी डफडे वाजवले, आता बंदची हाक..

आंबेडकर म्हणाले, "मी कुठल्याही आघाडीबरोबर गेलो, तसेच ती आघाडी माझ्याशी प्रामाणीक राहिली तर माझ्यासमोर नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजप (BJP) याची आकडेवारी अजिबात मोठी नाही. याचं कारण असं की, १५ टक्के मते मी माझ्या आजोबांच्या (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) जोरावर मिळवतो. त्याचा वापर मी एकदाच केला. तो म्हणजे व्ही. पी. सिंग सरकारावेळेस. त्यानंतर त्याचा वापर केला नाही. तसेच आरएसएस (RSS) आणि भाजपने १४ टक्के मुस्लिमांची मते दूर केलेली आहेत. ही दोन्ही मते एकत्र केली तर ती ३० टक्क्यांवर जातात. मला ही दोन मते जोडायला फार वेळ लागणार नाही. जिंकण्यासाठी मला ३७ टक्के मते ओलांडण्याची गरज आहे."

Prakash Ambedkar
Sugar Factory News : गंगापूरचा बंद कारखाना सुरू करण्याचे दोन्ही पॅनलचे आश्वासन, उद्या मतदान..

सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांना मानणारा वर्ग आणि भाजपपासून दूर गेलेला वर्ग आहे. या दोन मतांच्या आधारे सरकार स्थापन करू शकतो, असा विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला. तसेच ही माझी ताकद, जमेची बाजू आहे. तिचा फायादा मी ज्यांच्याबरोबर जाईल, जे माझ्याशी प्रामाणिक राहतील त्यांना होईल, असेही आंबेडकर यांनी यावेळी सूचित केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com