MLA Narendra Mehta : भाजप आमदाराकडून पैशांची मागणी, कार्यकर्त्याचा खळबळजनक आरोप; ऑडिओ रेकॉर्डिंग असल्याचा शिंदेंच्या मंत्र्याचा दावा

Narendra Mehta Vs Pratap Sarnaik : आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडून पैशाची मागणी केल्याचा दावा भाजपच्याच कार्यकर्त्यानेच केले आहे.
Narendra Mehta Vs Pratap Sarnaik
Narendra Mehta Vs Pratap Sarnaiksarkarnama
Published on: 
Updated on: 

प्रकाश लिमये

Pratap Sarnaik News : इमारतीचा भोगवटा दाखला देण्यासाठी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी पैशाची तर महापौर डिंपल मेहता यांच्या पतीने एका फ्लॅटची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप भाजपच्याच कार्यकर्त्याने परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थित केला आहे. या संभाषणाची ध्वनीफितही आपल्याकडे असल्याचे या कार्यकर्त्याने सरनाईक यांना सांगितले. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून मेहता पुन्हा एका नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कंपनी विरोधात आलेल्या तक्रारी संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर महापालिकेच्या नगररचना कार्यालयात गुरुवारी (ता. २४) एक बैठक घेतली. या बैठकीला भाजपचे कार्यकर्ते देवराम मंडोरा आले होते. यावेळी त्यांनी आपल्या इमारतीला नगररचना विभाग भोगवटा दाखला देत नाही अशी तक्रार सरनाईक यांच्याकडे केली. हा भोगवटा दाखला देण्यासाठी नरेंद्र मेहता यांनी पैशांची मागणी केली तर त्यांचे बंधू व महापौरांचे पती विनोद मेहता यांनी आपल्याकडे फ्लॅटची मागणी केली. या संभाषणाची ध्वनीफितही आपल्याकडे असल्याचे त्यांनी सरनाईक यांना सांगितले.

त्यावर, मंडोरा यांनी कागदपत्रांची पूर्तता केली असेल तर कोणाच्याही दबावाला बळी न पडता त्यांना त्वरित भोगवटा दाखला द्यावा असे आदेश सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले.

मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कंपनी विरोधात ६३ तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत. त्यामुळे दर महिन्याला नगररचना कार्यलयात बैठक घेऊन सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम आपण करणार आहोत. न्यायालयाचे स्थगिती आदेश असतानही नगररचना विभागाने मेहता यांच्या कंपनीला बांधकाम परवानग्या दिल्या आहेत. या सर्व कागदपत्रांची व न्यायालयीन आदेशाची राज्य सरकारच्या विधी विभागाकडून पडताळणी केली जाणार आहे असे सरनाईक यांनी प्रसारमाध्यमाना सांगितले. यावरून सरनाईक यांनी मेहता यांच्याविरोधात आता जोरदार आघाडी उघडली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Narendra Mehta Vs Pratap Sarnaik
BJP Politics : महाराष्ट्र भाजपमध्ये मोठा संघटनात्मक बदल; संघटन महामंत्री पदावर 'या' दोन नेत्यांची नियुक्ती

बिनबुडाचे आरोप

दरम्यान यासंदर्भात नरेंद्र मेहता यांची प्रतिक्रिया घेतली असता सरनाईक हे नेहमीच बिनबुडाचे आरोप करत असतात. महापालिका निवडणूकीनंतर आपल्यावर खोटे आरोप कारण्याव्यतिरिक्त त्यांना दुसरे कोणतेच काम शिल्लक राहिलेले नाही. यातील एकही आरोप सिद्ध झालेला नाही. मंडोरा यांनी इमारतीची पुनर्बांधणी करताना मुळच्या ४० कुटुंबांना घरे न देऊन त्यांची फसवणूक केली आहे. याविरोधात रहिवाशांना घेऊन आपण पोलिसांकडे तक्रार केली आहे म्हणून मंडोरा आपल्यावर खोटे आरोप करत आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Narendra Mehta Vs Pratap Sarnaik
Rahul Gandhi Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांनी माफीचा साक्षीदार व्हावे, PM मोदी-शहांची चौकशी..! राहुल गांधींच्या विधानाने राजकारणात खळबळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com