Priyanka Chaturvedi news : ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार-आमदार फुटत असतानाच प्रियांका चतुर्वेदींनी घराणेशाहीकडे दाखविलं बोट; म्हणाल्या, राजकारणात स्वबळावर...

Priyanka Chaturvedi, Dynasty politics : आपण राजकारण सोडणार नाही, असे प्रियांका चतुर्वेदी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील घडामोडींवर त्या फारशा बोलताना दिसत नाहीत.
Priyanka Chaturvedi
Priyanka ChaturvediSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena UBT : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकसभेतील सहा खासदारांनी नुकताच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. पक्षाचे आमदारही शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांच्या पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. या नेत्यांकडून उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर घराणेशाहीच्या मुद्द्यावरही सातत्याने टीका केली जात आहे.

आता ठाकरेंच्या पक्षाच्या माजी खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही घराणेशाहीवर भाष्य केले आहे. त्यांनी याबाबत सोशल मीडियात पोस्ट केल्याने चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये त्यांनी कुणाचाही किंवा घटना, प्रसंगाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे चतुर्वेदी यांनी केलेल्या या विधानावरही तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.

काय म्हटले आहे चतुर्वेदी यांनी?

माजी खासदार चतुर्वेदी यांनी घराणेशाहीचे फायदे किंवा विशेषाधिकारावर बोलताना म्हटले आहे की, घराणेशाहीतून मिळणारे फायदे फक्त तुम्ही कौटुंबिक वारशामुळे निवडलेल्या पक्षालाच नव्हे, तर याच संबंधांमुळे तुम्हाला आपल्या पक्षात जागा देण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या पक्षालाही मिळतो. राजकारणात आपले स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या बाहेरील व्यक्तींच्या चेहऱ्यावर विशेषाधिकाराचे हास्य कधीच दिसणार नाही, असे चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.

Priyanka Chaturvedi
BJP Politics : दिल्लीत मोठी राजकीय घडामोड; नगरसेवक, नेते नव्हे पक्षच झाला भाजपमध्ये विलीन, 'आप'शी कनेक्शन

चतुर्वेदी यांच्या या पोस्ट रोख नेमका कुणाकडे, याबाबत त्यांनी स्पष्ट केलेले नाही. आपण राजकारणात आतापर्यंत जे काही मिळविले आहे ते संघर्षातून, स्वबळावर मिळविल्याचे त्या सातत्याने सांगत असतात. पुन्हा राज्यसभेचे तिकीट न मिळाल्याने त्या सध्या पक्षात फारशा सक्रीय दिसत नाहीत. त्यांनी एका हरियाणातील एका शैक्षणिक संस्थेत अध्यापनाची जबाबदारी स्वीकारली आहे.

Priyanka Chaturvedi
BJP Politics: TMC सोडून BJPमध्ये प्रवेश केलेल्या तीनही खासदारांना काही तासांतच राज्यसभेची उमेदवारी जाहीर

आपण राजकारण सोडणार नाही, असेही चतुर्वेदी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील घडामोडींवर त्या फारशा बोलताना दिसत नाहीत. त्यामुळेही त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत सोशल मीडियात सातत्याने चर्चा झडत असतात. त्यातच आता त्यांनी घराणेशाहीकडे बोट दाखविल्याने तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com