Shiv Sena MLA Disqualification : 'आमदार अपात्रतेच्या निर्णयासाठी नार्वेकर दिल्लीतील भाजप कार्यालयात?' ; ठाकरे गटाने डिवचलं !

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : नार्वेकरांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका...
Shiv Sena MLA Disqualification
Shiv Sena MLA Disqualification Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : शिवसेना पक्षाच्या १६ आमदारांच्या अपात्रताप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर दिरंगाई केल्याबद्दल कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. आम्ही तीन महिन्यांची मुदत दिली नव्हती. पण, विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखायला हवा. गेल्या चार महिन्यांत अध्यक्षांनी केवळ एक सुनावणी घेतली. त्यानंतर पुढची तारीखही अध्यक्षांनी दिली नाही, अशी नाराजी न्यायलयाने व्यक्त केली होती. (Latest Marathi News)

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

Shiv Sena MLA Disqualification
Rahul Narwekar Delhi Tour: राहुल नार्वेकर दिल्लीला का गेले? संजय शिरसाटांनी सांगितले नेमके कारण...

दरम्यान, राहुल नार्वेकर काल दिल्ली दौऱ्यावर गेले होते. सुनावणीत दिरंगाई आणि दिल्ली दौरा यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी नार्वेकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले, "अपात्रतेच्या निर्णयासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिल्लीतल्या भाजप कार्यालयात जावं लागतंय, अशा शब्दांत राऊतांनी हल्लाबोल केला. अपात्रतेबाबत निर्णय लवकर झाला पाहिजे, अशीही ठाकरे गटाने मागणी केली आहे.

राहुल नार्वेकर हे काल (ता. २१ सप्टेंबर) दिल्लीच्या दौऱ्यावर निघाले होते. त्याबाबत विविध तर्क-वितर्क लढविले जात असतानाच खुद्द नार्वेकर यांनीच पुढे येऊन आपल्या दिल्ली दौऱ्याबाबत भाष्य केले आहे. त्यात त्यांनी आपण दिल्लीला का जात आहोत, हे स्पष्टपणे नमूद केले आहे. आपण या कार्यवाहीबाबतच दिल्लीला आल्याची माहिती त्यांनी दिली.

Shiv Sena MLA Disqualification
BJP Replay To Fauzia Khan : खासदार फौजिया खान यांच्या महिला आरक्षणाच्या विधेयकावरील टीकेवर भाजपचा खोचक पलटवार

दिल्लीत जाऊन राहुल नार्वेकर यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेत शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरणावर चर्चा केली आहे. तसेच, या प्रकरणाच्या निकालासंदर्भात चर्चा केल्यानंतर आता नार्वेकर पुढे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले होते?

शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी एका आठवड्याच्या आत सुनावणीची पुढची तारीख द्यावी. तसेच, या प्रकरणाचा निकाल कधीपर्यंत देणार याचे वेळापत्रक आम्हाला दोन आठवड्यांनी होणाऱ्या सुनावणीच्या वेळी द्यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.