Vidharbha Congress Leader: विदर्भातील काँग्रेस नेते तिसऱ्यांदा ठरले अपात्र; नियम डावलून निवडणूक लढणे पडले महागात

Ashok Rechankar News : अशोक रेचनकर हे लोकप्रतिनिधीपदावरून अपात्र झाले असले तरी त्यांची ताकद कायम आहे.
Ashok Rechankar
Ashok Rechankarsarkarnama

Chandrapur Political News: ग्रामीण राजकारण विविध ढंगांनी भरलेलं असतं. गावच्या सत्ताकारणात सत्ताधारी आणि विरोधक नेहमीच पाठशिवणीचा खेळ खेळत असतात. शह-कटशहाचे राजकारण तर गावोगावी दिसून येते. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील काँग्रेसचे नेते हे लोकप्रतिनिधीच्या विविध पदांवरून चक्क तिसऱ्यांदा अपात्र झाले आहेत. अशोक रेचनकर हे सकमूर येथील रहिवासी असून, ते आमदार सुभाष धोटे यांचे कट्टर समर्थक आहेत. तीनदा अपात्रता ठरल्याने रेचनकर यांची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. (The Congress leader was disqualified for the third time)

अशोक रेचनकर हे सकमूर येथील रहिवासी असून, गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीचे नेते आहेत. आमदार सुभाष धोटे यांच्या निकटवर्तीय फळीतील ते एक आहेत. सकमूरचे सरपंच असताना त्यांनी विविध विकासकामांचा धडाका लावला होता. गावच्या हिताचे अनेक निर्णय घेतले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांचे सभापतिपद हुकले होते. पण ते मागील काळात उपसभापती राहिले होते.

Ashok Rechankar
Women Reservation News : मोदींचा मास्टरस्ट्रोक ; विरोधकांना धक्का देत `वन नेशन, वन इलेक्शन` ऐवजी पास केले महिला आरक्षण बिल

अशोक रेचनकर यांनी सकमूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच असताना पदाचा गैरवापर करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करीत संतोष मुगलवार यांनी त्याबाबतची तक्रार प्रशासनाकडे केली होती. चौकशीत रेचनकर अपात्र ठरले होते. त्यानंतर विरोधकांना उत्तर देण्यासाठी रेचनकर यांनी अधिक जोमाने कामाला सुरुवात केली. मागील टर्ममध्ये बाजार समितीची निवडणूक लढविली आणि जिंकलीही. या वेळी त्यांना बाजार समितीचे सभापतिपद निश्चित होते. मात्र, आमदार सुभाष धोटेंच्या शब्दावर त्यांनी सुरेश चौधरी यांना सभापतिपद दिले आणि स्वतः उपसभापती झाले. पदावर काही काळ राहिल्यानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा त्यांना टार्गेट केले. सोसायटीचा सदस्य नसल्याचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला आणि तक्रार केली. यावेळीही अशोक रेचनकर हे अपात्र ठरले आणि त्यांना बाजार समितीचे पद गमवावे लागले.

सध्या रेचनकर हे सकमूर ग्रामपंचायतीचे सदस्य होते. उपसरपंच म्हणून अपात्र झाल्यानंतर सहा वर्षे निवडणूक लढविता येत नाही. पण, नियमांचा भंग करून रेचनकरांनी निवडणूक लढविली अन् जिंकलीसुद्धा. याहीवेळी रेचनकरांवर टपून असलेल्या विरोधकांनी त्यांची तक्रार केली. यावेळीही ते अपात्र झाले. रेचनकर यांनी आयुक्ताकडे अपील केले. मात्र, ते फेटाळण्यात आले. सतत तीनदा रेचनकर हे अपात्र झाल्याने आता ही चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच पसरली आहे.

Ashok Rechankar
MLA Disqualification Case Update : आमदार अपात्रता प्रकरणात मोठी घडामोड; विधानसभा अध्यक्ष दोन दिवसांत ठाकरे-शिंदे यांना नोटीस पाठविणार

अपात्र ठरले मात्र ताकद कायम

अशोक रेचनकर हे लोकप्रतिनिधीपदावरून अपात्र झाले असले तरी त्यांची ताकद कायम आहे. त्यांच्या पत्नी अपर्णा रेचनकर या सकमूरच्या सरपंचपदी कार्यरत आहेत. या वेळी नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत ते संचालक म्हणून निवडून आले आहेत.

Ashok Rechankar
Sharad Pawar to Patel : भेटीचा फोटो ट्विट करणाऱ्या प्रफुल्ल पटेलांना पवारांनी विचारला जाब

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com