Raj Thackeray Speech : शिवाजी पार्कवर राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव तो व्हिडिओ'; म्हणाले, 'ते' हिंदुत्ववादी मूर्ख...

Raj Thackeray Hindutvavadis : गंगेचे पाणी प्रदुषण असलेल्या म्हणत राज ठाकरेंनी गंगेची सद्यस्थिती काय आहे हे दाखवणारा व्हिडिओ लावला. गंगेत येणारे मृतदेह, प्रदुषित पाणी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी दाखवले.
Raj Thackeray
Raj Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray News : कुंभमेळ्यातून आणलेल्या पाण्यावरून केलेल्या वक्तव्यावरून राज ठाकरें यांच्या टीका केली जात होती. त्या टीकेला राज ठाकरेंनी आज शिवाजी पार्कवरील आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच उत्तर दिले. ते म्हणाले, 'मी बाळ नांदगावकरला म्हटलो होतो ते कुंभमेळ्यातून आणलेले पाणी मी पिण्यात नाही. त्यावरून माझ्यावर काही हिंदुत्ववादी टीका करत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटलं मी कुंभमेळ्याचा अपमान केला. मूर्ख आहेत का ते.'

गंगेचे पाणी प्रदुषण असलेल्या म्हणत राज ठाकरेंनी गंगेची सद्यस्थिती काय आहे हे दाखवणारा व्हिडिओ लावला. गंगेत येणारे मृतदेह, प्रदुषित पाणी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी दाखवले.

Raj Thackeray
Bihar elections leadership: 'एनडीए'चा प्लॅन ठरला; बिहारच्या निवडणुका होणार 'यांच्या' नेतृत्वाखाली; अमित शाहांचे संकेत

राज ठाकरे म्हणाले, गंगेची परिस्थिती पाहिली का? महंताचा मृतदेह बोटीतून तसाच्या तसा टाकून दिला. घाटावर प्रेतं टाकली जातायेत. हा कोणात धर्म. आपल्या नद्या स्वच्छ राहिल्या पाहिजे. नद्यांमधील काही भाग येवढे गलिच्छ आहेत. या नद्या आपण धर्माच्या नावाखाली बरबाद करतोय. प्रत्येकाला आपला धर्म प्यारा असतो. धर्मामध्ये प्रत्येकाने सुधारणा करायला पाहिजे.

बीडमध्ये राखेतून गुंड उभे राहताता. वाल्मिक कराड आणि जी नावे येतात त्यांना संतोष देशमुखने विरोध केला. विषय होता खंडणीला विरोध करण्याचा. पण आपण लेबल काय लावलं तर वंजाऱ्याने मराठ्याला मारलं. यात मराठा वंजाऱ्याच्या काय संबंध, असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.

Raj Thackeray
Shambhuraj Desai : 'कामराचं कोणाशी कनेक्शन?, त्याच्या ‘शो’ला कोण पैसे देतंय?, कॉल डिटेल्स ही माहिती आमच्याकडे; त्याला पोलिसांचा टायरमधील पाहुणचार द्यावाच लागेल'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com