Shambhuraj Desai : 'कामराचं कोणाशी कनेक्शन?, त्याच्या ‘शो’ला कोण पैसे देतंय?, कॉल डिटेल्स ही माहिती आमच्याकडे; त्याला पोलिसांचा टायरमधील पाहुणचार द्यावाच लागेल'

Kunal Kamra Case : कुणाल कामरा याच्या विषयी आमच्याकडे सगळी माहिती आहे. त्याचे कनेक्शन कोणासोबत आहेत, त्याच्या सगळ्या ‘शोज’ला कोण आर्थिक मदत करतंय. त्यांचे कॉल्स डिटेल्स, त्याचं संभाषण कोणाबरोबर झालेले आहे. ही सर्व माहिती आमच्याकडे आहे.
Shambhura jDesai-Kunal Kamra
Shambhura jDesai-Kunal Kamra Sarkarnama
Published on
Updated on

Satara, 30 March : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कविता करणाऱ्या कुणाल कामराच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राज्याचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी तर कुणाल कामराला टायरमध्ये घालून पोलिसांची थर्ड डिग्री देण्यात येईल, अशी आक्रमक भूमिका घेतली हेाती. त्याच भूमिकेचा देसाई यांनी आज पुन्हा पुनरुच्चार केला.

स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामराने (Kunal Kamra) केलेल्या कवितेनंतर शिवसैनिकांनी स्टुडिओची तोडफोड केली होती.कामरा याच्याविरोधात विविध ठिकाणी गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. तसेच, मंत्र्यांनीसुद्धा कामराच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे देसाईच्या बोलण्यावरून स्पष्ट होत आहे.

शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले, कुणाल कामराची पाठीमागची वक्तव्ये, लिखाण बघा. दोन समुदायामध्ये, दोन गटांमध्ये, दोन विचारसरणींच्या लोकांमध्ये तेढ निर्माण होऊन समाजात अशांतता निर्माण होईल, हा त्याचा प्रत्येक वेळचा प्रयत्न आहे. तो टार्गेट फक्त शिवसेना आणि भाजपलाच करत आहे. इतर राजकीय पक्षांबाबत त्याच्याकडून असं होत नाही. त्याची ही सवय आहे, असं आमचं म्हणणं आहे.

Shambhura jDesai-Kunal Kamra
Laxman Dhoble : लक्ष्मण ढोबळेंचा अजितदादांना सल्ला; म्हणाले, ‘अर्थमंत्रालयाच्या ‘त्या’ फाईलवर सही करा, ती फायदेशीर ठरेल’

कुणाल कामरा याने ती गोष्ट पहिल्यांदा केली, तर आपण समजू शकतो. पण, तो पुन्हा पुन्हा तेच करत आहे, म्हणून मी म्हटलं की, कुणाल कामरा सापडला पाहिजे, सरळमार्गाने त्याने केलेल्या गोष्टी कबूल केल्या नाहीत, तर पोलिसांचा टायरमधील पाहुणचार कसा असतो, हे सर्वांना माहिती आहे. तो द्यावा लागेल, असं मी म्हटलं आहे. त्यावर मी आजही ठाम आहे, असे देसाई यांनी स्पष्ट केले.

शंभूराज देसाई म्हणाले, कुणाल कामरा याला मद्रास उच्च न्यायालयाने सात एप्रिलपर्यंत अटकपूर्व जामीन दिलेला आहे. हे प्रकरण सध्या कोर्टात आहे, त्यामुळे त्यावर जादा भाष्य करणे योग्य नाही. पण, जेव्हा त्याला अटक करण्यात येईल, तेव्हा पोलिस चौकशीतून सगळ्या गोष्टी बाहेर येतील. आम्ही आता त्यावर जास्त बोलणं योग्य नाही.

Shambhura jDesai-Kunal Kamra
Jaykumar Gore : ...तेव्हा बारामतीकरांच्या छातीत सर्वांत पहिल्यांदा कळ आली; पण, मी बारामतीच्या पुढं कधी झुकलो नाही अन्‌ झुकणारही नाही : जयकुमार गोरेंचा इशारा

कुणाल कामरा याच्या विषयी आमच्याकडे सगळी माहिती आहे. त्याचे कनेक्शन कोणासोबत आहेत, त्याच्या सगळ्या ‘शोज’ला कोण आर्थिक मदत करतंय. त्यांचे कॉल्स डिटेल्स, त्याचं संभाषण कोणाबरोबर झालेले आहे. ही सर्व माहिती आमच्याकडे आहे. त्याची पोलिस चौकशी होऊद्या, कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com