Raj-Uddhav Thackeray Meeting : राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची भेट टाळली? 'त्या' पत्रावरून वेगळीच चर्चा

Shivsena UBT MNS RajThackeray Uddhav Thackeray : मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीने आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते युतीसाठी आशावादी आहेत.
Uddhav Thackeray, Raj Thackeray
Uddhav Thackeray, Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

BMC Election : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेमध्ये युती होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एका हाॅटेलमध्ये राज ठाकरेंनी भेट घेतल्याने युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ठाकरे बंधु एकत्र यावेत यासाठी मनसे आणि शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते साद घालत आहेत. राज ठाकरेंचा आज (14 जून) वाढदिवस आहे. या दिवशी उद्धव ठाकरे हे राज यांच्या 'शिवतीर्थ' या घरी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार अशी चर्चा होती.

वाढदिवसाच्या निमित्ताने युतीच्या चर्चेला अधिक बळ मिळेल, अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत होती. मात्र, 11 जूनला राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांसाठी लिहिलेल्या पत्रामुळे राज-उद्धव ठाकरे भेट टळल्याची चर्चा आहे. राज ठाकरे हे मुंबईबाहेर गेल्याने त्यांनी ही भेट टाळली का? असे देखील बोलले जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीने आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मनसेसोबत युती करण्याचा आशावाद कायम आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, राजकारणात कोणीही कोणाला भेटी शकतो त्याचा वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही.

Uddhav Thackeray, Raj Thackeray
Imtiaz Jaleel-Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या राजकीय दबावामुळेच माझ्यावर ॲट्रॉसिटी! कोर्टात खेचणार..

राज ठाकरेंना कालही शुभेच्छा होत्या...

संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, आज राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. कालही शुभेच्छा होत्या आजही आहेत आणि उद्याही असतील. देवेंद्र फडणवीसांच्या भेटीबाबत बोलताना राऊत म्हणाले, फडणवीस हा विषय वेगळा आहे.आमची भूमिका मराठी माणसाला न्याय द्यायची आहे. मराठी माणूस टिकावा त्याचे स्थान हक्क मिळायला हवे, ही भूमिका राज ठाकरे यांची असेल आणि आम्ही त्या भूमिकेतून एकत्र येण्याचा विचार राज ठाकरे यांनी मांडला. उद्धव ठाकरे यांनी त्याला पाठिंबा दिला. भाजप आणि त्यांचे लोक हे मराठी माणसाचे शत्रू आहेत हे लोकांनी ठरवलं आहे.

Uddhav Thackeray, Raj Thackeray
Eknath Shinde : नाशिक मनपासाठी एकनाथ शिंदेंचा बिग प्लॅन, सर्व निर्णय घेण्याचे अधिकार दिले आपल्या जिवलग मित्राला...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com