Raj Thackeray Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना त्यांच्या बालेकिल्ल्यातच घेरणार, राज ठाकरे देणार विजयाचा मंत्र!

Raj Thackeray Politics MNS Rally : राज ठाकरे यांनी आगामी महापालिकेची रणनीती निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. 30 ऑगस्टला ते ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
Raj Thackeray Eknath shinde
Raj Thackeray Eknath shinde sarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray News : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार हे निश्चत मानले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी गणरायाचे आगमनच्या दिवशीच राज ठाकरेंच्या घरी जात गणरायचे दर्शन घेतले. राज आणि उद्धव ठाकरेंची जवळीक वाढत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.

ठाकरे बंधूंची युती झाली तर त्याचा सर्वाधिक फटका एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. मुंबईमधील त्यांची मराठी मते त्यांच्यापासून दूरवण्याची शक्यता आहे. त्यातच शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात त्यांना घेरण्याचा प्लॅन राज ठाकरेंनी केल्याची चर्चा आहे.

राज ठाकरे हे 30 ऑगस्टला ठाण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ठाणे शहरातील सीकेपी हाॅल येथे ते मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे ठाणे महापालिका निवडणुकीची रणनीती ते ये मेळाव्यात निश्चित करण्याची शक्यता आहे.

ठाकरे बंधुंची युती झाल्यास ज्या प्रकारे मुंबईत शिंदेंना फटका बसण्याची शक्यता आहे तसेच ठाण्यात देखील शिंदेंची अडचण वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे या मेळाव्यात राज ठाकरे नेमका विजयाची काय मंत्र देतात याची उत्सुकता मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये आहे.

राज ठाकरे 'अ‍ॅक्शन मोड'वर

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिने राज ठाकरे हे अॅक्शन मोडवर आहेत. सर्वप्रथम त्यांनी मनसे नेते, पदाधिकारी यांचे नाशिकमधील इगतपूरी येथे शिबिर घेतले. या शिबराविषयी माध्यमांमध्ये काहीच बोलू नये, असा सूचना देखील त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मुंबईत देखील पदाधिकाऱ्यांचे सूचना देत आगामी महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंसोबत युतीचे संकेत दिले होते. आता ते ठाण्यामध्ये शिबिर घेणार आहेत. या शिबिरातून ते ठाणे, कल्याण, डोंबिवली महापालिकेची रणनीती निश्चित करण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com