Raj Thackeray: ...अखेर राज ठाकरेंनी शिंदे अन् भाजपच्या बालेकिल्ल्यात मनसेचा उमेदवार दिलाच,'या' दोन शिलेदारांना तिकीट

MNS Political News : मनसेचे सर्वाधिक 13 आमदार 2009 मध्ये निवडून आले होते. त्यानंतरच्या 2014 आणि 2019 या दोन विधानसभा निवडणुकीत मनसेने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Kalyan Dombivali News : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये आपले उमेदवार न देता थेट महायुतीच्या उमेदवारांना आपला पाठिंबा दर्शवला होता.एवढंच नाही तर महायुतीच्या नारायण राणे, श्रीकांत शिंदे,मुरलीधर मोहोळ,संदिपान भुमरे यांच्यासाठी जाहीर सभाही घेतल्या होत्या. यानंतर विधानसभा निवडणुकीत मनसे-महायुती एकत्र लढणार असल्याची चर्चाही होती.

पण अशातच आता विधानसभा निवडणुकीला राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 'एकला चलो' ची भूमिका घेतल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांनीन आता मोठी घोषणा घेतली असून 'माघार नाही तर टक्कर' देण्याची तयारी सुरू केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेकडून (MNS) 288 विधानसभा मतदारसंघांपैकी किमान 200 विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार देण्याची तयारी करण्यात येत आहे.आता राज ठाकरे यांनी ठाणे आणि कल्याण डोंबिवली मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले आहे.

Summary

ठाण्यातून अविनाश जाधव तर कल्याण डोंबिवलीतून विद्यमान आमदार राजू पाटलांनाच पुन्हा मनसेची उमेदवारी जाहीर केली आहे. अनेक ठिकाणी तिकीट न मिळालेल्या बंडखोरांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याचा प्लॅन देखील पक्षाचा असल्याचा बोलला जात आहे.

Raj Thackeray
Sunil Tingre: धाकधूक वाढली! वडगाव शेरी भाजपाच्या वाट्याला? सुनील टिंगरेंनी घेतली दादांची भेट

सध्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात आघाडी आणि महायुतीमध्ये पक्षाकडून तिकीट मिळावं यासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष सध्या पाहायला मिळत आहे. तिकीट न मिळालेल्या स्ट्रॉंग उमेदवारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न देखील आगामी काळात होणार असल्याचे सांगितले जात आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. त्यांनी यंदा स्वबळावर उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. यातील काही मतदारसंघात उमेदवारांची नावे देखील जाहीर करण्यात आली.

Raj Thackeray
Ajit Pawar NCP: भाजपचे उमेदवार जाहीर अन् धक्के अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला; अनुराधा नागवडेंचा मोठा निर्णय

मनसेचे सर्वाधिक 13 आमदार 2009 मध्ये निवडून आले होते. त्यानंतरच्या 2014 आणि 2019 या दोन विधानसभा निवडणुकीत मनसेने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही मनसेला जुन्नरच्या फक्त एका जागेवर शरद सोनावणे यांना मनसेच्या तिकीटावर लढून विजय मिळाला होता.

तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही एकाच जागेवर विजय मिळाला होता. कल्याण डोंबिवलीतून राजू पाटील यांनी अत्यंत अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांचा पराभव केला होता.

राज ठाकरेंनी घोषित केलेले उमेदवार

1. बाळा नांदगावकर - शिवडी,  मुंबई
2. दिलीप धोत्रे - पंढरपूर  
3. लातूर ग्रामीण - संतोष नागरगोजे
4. हिंगोली विधानसभा - बंडू कुटे
5. चंद्रपूर - मनदीप रोडे
6. राजुरा - सचिन भोयर
7. वणी - राजू उंबरकर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com