Ajit Pawar NCP: भाजपचे उमेदवार जाहीर अन् धक्के अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला; अनुराधा नागवडेंचा मोठा निर्णय

Anuradha Nagawade resigned from Ajit Pawar NCP: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे यांनी श्रीगोंदा मतदारसंघात भाजपचा उमेदवार जाहीर होताच मोठा निर्णय घेतला आहे.
Anuradha Nagawade
Anuradha Nagawade Sarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : भाजपने विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली आणि अजित पवार यांना अहिल्यानगर जिल्ह्यातून पहिला धक्का बसला आहे. श्रीगोंद्यातील नेत्या अनुराधा नागवडे यांनी अजित पवारांची साथ सोडली आहे. पक्षाचा पदाचा राजीनामा दिला आहे.

"कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुकीला आम्ही समोरे जाणार आहोत. या निवडणुकीत श्रीगोंद्याचा विकासाचा बॅकलाॅग भरून निघणार आहे. त्यामुळे माघार घ्यायची नाही, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, असे म्हणत अपक्ष किंवा चिन्हांवर आम्ही निवडणुकीच्या रिंगणात दिसू", असे अनुराधा नागवडे यांन म्हटले.

विधानसभेच्या भाजपच्या पहिल्या यादीत श्रीगोंदा मतदारसंघात भाजपचे (BJP) आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांनी उमेदवारी जाहीर झाली आहे. महायुतीमध्ये सहभागी असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या जागेसाठी आग्रह होता. परंतु या जागेवर भाजपने कायम दावा ठेवला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या अनुराधा नागवडे यांनी नाराजी व्यक्त करत अजित पवार यांच्या पक्षाची साथ सोडली आहे.

Anuradha Nagawade
Ajit Pawar : बारामती की शिरूर? अजितदादांचं ठरलं, प्रचारालाही सुरूवात...

श्रीगोंदा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून अनुराधा नागवडे यांनी काँग्रेसची (Congress) साथ सोडत, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परंतु महायुती असलेल्या राष्ट्रवादीकडून त्यांच्या पदरी निराशाच आली. त्यामुळे नागवडे यांनी कार्यकर्तांचा मेळावा घेत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.

आपण कोणत्याही परिस्थिती निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. दोन दिवस थांबा, बरच काही तुम्हाला समजेल. अपक्ष तरी निवडणुकीच्या रिंगणात असेल किंवा चिन्हांवर देखील निवडणूक लढताना दिसते. पण यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार निवडणुकीतून माघार नाही, असे अनुराधा नागवडे यांनी म्हटले.

Anuradha Nagawade
Rahuri Assembly Constituency: शिवाजी कर्डिलेंची डोकेदुखी वाढली; सत्यजित कदम म्हणाले, 'भाजपने शब्द फिरवला, आता माझे कार्यकर्ते...'

पक्षांच्या अडचणी आहेत

अनुराधा नागवडे म्हणाल्या, "दोन दिवसात मोठा निर्णय घेणार आहोत. अपक्ष पण लढू शकते किंवा चिन्हांवर देखील लढू शकते. पण उमेदवारी करणारच! तिकडं उमेदवारी नव्हती, म्हणून राजीनामा दिला. पक्षांच्या अडचणी आहेत. आम्ही प्रयत्न करत आहोत. कार्यकर्त्यांची भावना आहे की, उमेदवारी करायचीच!" सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे यांनी श्रीगोंद्यासाठी खूप मोठं योगदान दिलं आहे. ही परंपरा कायम राहावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात नागवडे परिवार असणार आहे. आदरणी शिवाजीराव नागवडे असते, तर परिवारावर ही वेळ आली नसती, असे भावनात्मक उद्गगार अनुराधा नागवडे यांनी केले.

विकासाचा खूप मोठा बॅकलाॅग...

"आम्ही निवडणूक आली की, आम्ही बोलतो, असे नाही. परंपरा राखून प्रत्येक काळात नागवडे परिवार श्रीगोंद्यातील परिवारात सहभागी असतो. पाणी, लाईट, साकळाई योजना, पाटपाण्याचे प्रश्न आहे, श्रीगोंदा तालुक्यातील बेपत्ता असलेल्या मुलींची यादी माझ्याकडे आहे. श्रीगोंद्याच्या विकासाचा खूप मोठा बॅकलाॅग भरून काढायचा आहे.

मी माझ्या जनतेची दिशाभूल करून, निवडणुकीपुरते हे मुद्दे उचलून धरायचे, असे आमच्याकडून होणार नाही. विसरणार नाही. प्रत्यक्षात यावर काम सुरू आहे. पुढेही सुरू राहील. स्पर्धक हा स्पर्धकच असतो, त्यांच्याबरोबर आम्ही तसंच वागणार", असे अनुराधा नागवडे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com