Amit Thackeray: राज ठाकरे की उद्धव ठाकरे? कोण मुख्यमंत्री झालेलं आवडेल? अमित ठाकरेंनी दिलं सडेतोड उत्तर

Amit Thackeray: राज्यात जर ठाकरेंची सत्ता आली तर महाराष्ट्राच्या विकासाचं त्यांचं व्हिजन काय असेल यावर अमित ठाकरे यांनी सविस्तर उत्तर दिली आहेत.
Amit Thackeray
Amit Thackeray
Published on
Updated on

Amit Thackeray: राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकांमधून शहराचे महापौर आणि नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यासाठी ठाकरे बंधुंनी चांगलीच कंबर कसली आहे. विशेषतः मुंबई महापालिकेवर त्यांचा विशेष भर आहे. कारण ही निवडणूक त्यांची प्रतिष्ठेची निवडणूक आहे. पण तरीही दोन्ही ठाकरे बंधू हे मुख्यमंत्री होण्याच्या दर्जाचे नेते आहेत. त्यामुळं या दोघांपैकी कोण मुख्यमंत्री झालेला आवडेल? या प्रश्नावर राज ठाकरेंचे पुत्र आणि मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

Amit Thackeray
PSI Death: धक्कादायक! तासगावच्या पोलीस उपनिरिक्षकानं पुण्यात संपवलं जीवन; प्रोबेशन पूर्ण करुन महिन्याभरापूर्वीच मिळाली होती पोस्टिंग

एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर मुलाखतीदरम्यान, अमित ठाकरे यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचबरोबर सध्याच्या महापालिका निवडणुका आणि विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली मतं मांडली. त्याचबरोबर मनसे आणि शिवसेनेची युती मुंबईकरांसाठी नेमकं काय व्हिजन घेऊन येणार आहे, याची त्यांनी माहिती दिली. तसंच अमित ठाकरे यांच्यावर नेमका कोणाचा प्रभाव आहे? महाराष्ट्राचं राजकारण कसं आहे? किंबहुना ते कसं असायला हवं? तसंच ठाकरे ब्रँड, झेन झी अशा विविध मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केलं आहे.

Amit Thackeray
'शिवाजी पार्क'च्या सभेसाठी BMC किती भाडं आकारते? आकडा ऐकला तर बसेल धक्का

दरम्यान, महाराष्ट्राच्या व्हिजनवर बोलत असताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल? वडिलांना की काकांना? यावर अमित ठाकरे यांनी उत्स्फुर्तपणे उत्तर दिलं की, काका झाले ना आता! म्हणजे यानंतर ठाकरेंपैकी मुख्यमंत्रीपदी आपले वडील राज ठाकरे यांना पाहायला आवडेल असं अमित ठाकरे यांनी म्हटलं. त्याचबरोबर जर राज ठाकरेंच्या हातात राज्याची सत्ता आली आणि जर ते मुख्यमंत्री झाले तर तुम्ही कधी अपेक्षाही केली नसेल त्याच्या पलिकडे महाराष्ट्र घडवू असा विश्वास त्यांनी केला.

Amit Thackeray
BMC Election: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंची ताकद वाढली! रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या आक्रमक पक्षाकडून पाठिंबा जाहीर

राजकीय नेत्यांचे मोठ्या रक्कमेचे घोटाळे तसंच गुन्हेगारीकरणं एका फटक्यात संपवू असा विश्वासही यावेळी अमित ठाकरे यांनी व्यक्त केला. राजकारणात आपली येण्याची इच्छा नव्हती पण २०१४ नंतर मनसेचा पडता काळ होता तेव्हा आपले वडील म्हणजेच राज ठाकरे हे एकटे पडू नयेत त्यांना आपण साथ दिली पाहिजे. आपल्या असण्यामुळं त्यांना १० टक्के जरी फायदा झाला तरी ती मोठी गोष्ट असेल या हेतून आपण राजकारणात दाखल झालो अशी माहिती यावेळी अमित ठाकरे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com