PSI Death: धक्कादायक! तासगावच्या पोलीस उपनिरिक्षकानं पुण्यात संपवलं जीवन; प्रोबेशन पूर्ण करुन महिन्याभरापूर्वीच मिळाली होती पोस्टिंग

PSI Death: डेक्कन भागातील एका हॉटेलवर त्यांचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे.
Suraj Marathe
Suraj Marathe
Published on
Updated on

PSI Death: पुण्यातील डेक्कन परिसरातील आपटे रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये पोलिस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. ७) दुपारी उघडकीस आली. सूरज मराठे (वय ३०) असे मृत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून, ते सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलिस ठाण्यात कार्यरत होते.

Suraj Marathe
'शिवाजी पार्क'च्या सभेसाठी BMC किती भाडं आकारते? आकडा ऐकला तर बसेल धक्का

सूरज मराठे हे मूळचे पुणे जिल्ह्यातील देहू येथील रहिवासी होते. त्यांनी नुकताच पोलिस उपनिरीक्षक पदाचा प्रोबेशन (परीविक्षा) कालावधी पूर्ण केला होता. त्यानंतर सुमारे महिनाभरापूर्वी त्यांची तासगाव पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक पदी नेमणूक झाली होती, ते अविवाहित होते.

Suraj Marathe
BMC Election: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंची ताकद वाढली! रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या आक्रमक पक्षाकडून पाठिंबा जाहीर

मराठे यांना काही दिवसांपासून गुडघेदुखीचा त्रास होत असल्याने ते ३० डिसेंबरपासून वैद्यकीय रजेवर होते. त्यांनी मंगळवारी डेक्कन परिसरातील आपटे रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये खोली घेतली होती. दुसऱ्या दिवशी बुधवारी दुपारपर्यंत खोलीचा दरवाजा बंदच राहिल्याने हॉटेल व्यवस्थापनाने ही बाब पोलिसांना कळवली.

Suraj Marathe
Aimim Politics : नाराजांच्या राड्यानंतरही ओवैसीही जलील यांच्या पाठिशी : हल्ला MIM ला महापालिकेत 'बुस्ट' मिळवून देणार की 'बुमरँग' होणार?

माहिती मिळताच डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा उघडून पाहणी केली असता सूरज मराठे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.

Suraj Marathe
nominated councillor Politics : उपनगराध्यक्षासह स्वीकृत नगरसेवकपदासाठी राजकीय हालचालींना वेग, चढाओढ अन् पक्षांची नावांबाबत गुप्तता

दरम्यान, आत्महत्येपूर्वी मराठे यांनी एक चिठ्ठी लिहिल्याचे पोलिस तपासात आढळून आले आहे. ‘या घटनेस कोणालाही जबाबदार धरू नये. वैयक्तिक वैद्यकीय कारणांमुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत आहोत,’ असे चिठ्ठीत नमूद केले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून, अंतिम अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com