BMC Election: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंची ताकद वाढली! रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या आक्रमक पक्षाकडून पाठिंबा जाहीर

BMC Election : मुंबई महापालिका जिंकणं ही ठाकरे बंधुंसाठी प्रतिष्ठेची लढाई आहे तर भाजप-शिवसेना युतीसाठी महत्वाकांक्षी निवडणूक. पण मुंबईत कोणाची सत्ता असावी यासाठी इतर छोटे पक्षही आपली भूमिका मांडताना दिसत आहेत.
Thackeray brothers alliance
Thackeray brothers alliance Sarkarnama
Published on
Updated on

BMC Election: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची सध्या चर्चा सुरु आहे. शिवसेना-भाजपच्या युतीला त्यांनी चांगलंचं आव्हान निर्माण केलं असल्याचंही बोललं जात आहे. त्यातच आता रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आक्रमक पक्षानं ठाकरे बंधुंच्या युतीला पाठिंबा जाहीर केला आहे. तसंच मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे यासाठी हा पाठिंबा असल्याचं या पक्षाच्या नेत्यानं स्पष्ट केलं आहे.

Thackeray brothers alliance
NCP-BJP Alliance: अजित पवारांच्या मंत्र्यानं जिरवला भाजपचा हट्टीपणा! CM फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर युतीची वाट मोकळी

ठाकरे बंधुंसाठी मुंबई महापालिका निवडणुकीतील नरेटिव्ह हे प्रामुख्यानं मराठी माणूस हेच आहे. त्याचबरोबर गेल्या चार वर्षांपासून मुंबई महापालिकेत प्रशासकराज असून महापालिका आयुक्त संपूर्ण कारभार पाहात होते, जे आयुक्त थेट राज्याच्या गृहखात्याच्या अंतर्गत येतात. त्यामुळं सहाजिकचं मविआचं सरकार कोसळल्यानंतर जून २०२२ नंतर भाजप-शिवसेनेचं राज्यात सरकार राहिलं ते पुढच्या निवडणुकीनंतरही अद्यापपर्यंत कार्यरत आहे. म्हणून गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून भाजप-शिवसेनेचा प्रभाव मुंबई महापालिकेवर राहिला आहे. त्यामुळं केवळ मराठी माणूसच नव्हे तर गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय हिंदी भाषिक यांना सोबत घेऊन जाताना सर्वांना हिंदू म्हणून एकत्र करुन भाजप-शिवसेना यंदाच्या निवडणुकीला समोरं जात आहे.

Thackeray brothers alliance
BMC Election: मुंबई महापालिकेवर आजी-माजी आमदार, खासदारांचा डोळा; तब्बल 19 वारसदार निवडणुकीच्या मैदानात; विरोधकांचंही तगडं आव्हान

पण मुळातच मुंबईतून मराठी माणसाची होत असलेली पिछेहाट ही उर्वरित महाराष्ट्रातल्या जनेतला देखील खटकणारी बाब ठरली आहे. त्याचमुळं आजपर्यंत मराठी माणसासाठी राजकारण करणाऱ्या ठाकरेंच्या 'मराठी माणूस' या संकल्पनेत मराठी बोलणारे सर्वच जाती-धर्माचे आणि पूर्वीपासून मराठी म्हणूनच मुंबईत स्थायिक झालेले परप्रांतिय लोक यांचा समावेश आहे. त्यामुळं हा मराठी माणूस मुंबईत टिकून राहावा यासाठी ठाकरेंना पाठिंबा देणं गरजेचं असल्याचं रस्त्यावरची लढाई लढणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

Thackeray brothers alliance
Municipal Election Voting Process : महापालिकेसाठी EVM वर कितीवेळा बटन दाबवे लागणार? मतदान करण्यापूर्वी महत्त्वाचा नियम समजून घ्या!

राजू शेट्टींची नेमकी भूमिका काय?

मराठी माणसाच्या भल्यासाठी मुंबईत ठाकरेच पाहिजेत. त्यामुळं ठाकरे मुंबईत विजयी होवोत अशी आपली इच्छा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मराठी प्रेमावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना शेट्टी म्हणाले की, "मराष्ट्राच्या हक्काचे किती प्रकल्प त्यांनी गुजरातला पाठवले याची माहिती घ्यावी. राज्यातील इतर महापालिकांमध्ये राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. तर केवळ मुंबईतच काँग्रेसला पाठिंबा न देता ठाकरे बंधुंना त्यांनी पाठिंबा दिला आहे"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com