Raj Thackeray : 'जातीपातींमध्ये द्वेष पसरवून फक्त मतं...' राज ठाकरेंनी सुनावले

Raj Thackeray Maratha Reservation : जातीच विष शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोचवले जात असल्याचे सांगून राज यांनी आरक्षणामुळे ओढावलेल्या स्थितीवर बोट ठेवले.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

Raj Thackeray News : महाराष्ट्रात मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मागणीवरून वातावरण तापले असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीपातीच्या मुद्यावर भूमिका मांडली आणि भविष्यातील भीती देखील वर्तवली आहे. जातीच विष शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोचवले जात असल्याचे सांगून राज यांनी आरक्षणामुळे ओढावलेल्या स्थितीवर बोट ठेवले. त्यापलिकडे जाऊन महाराष्ट्राचा युपी, बिहार होण्याची भीती व्यक्त केली.

इतकी वर्ष मी भाषणांमधून सांगत आलोय की द्वेष पसरवून मतं हातात घेतील. आणि भोळसटपणे मतं देतील ही. जातीवर बोलणाऱ्या लहान मुलींचा व्हिडिओ मला कोणीतरी मला पाठवला होता. ते पाहून हे सगळं प्रकरण शाळा-कॉलेजांपर्यंत जाणार, असं मी म्हणाले होतो.

लावा बांबू

महायुतीला विधानसभेत बांबू लावला आता बांबू आरपार करू, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. या वक्तव्यावर राज ठाकरेंना Raj Thackeray विचारले असते. त्यांनी फक्त एकच शब्द उच्चारला 'लावा बांबू'

Raj Thackeray
Video Maratha Reservation News : जरांगेंच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या तारख यांच्या तोंडाला काळे फासले..

जुलैमध्ये महाराष्ट्र दौरा

जुलैमध्ये राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत मनसे MNS किती जागांवर लढणार, असा प्रश्न पत्रकारांनी राज ठाकरे यांना विचारला मी आताच सांगणार नाही. वेळ आली की तुम्हाला कळेल, असे म्हणत राज ठाकरेंनी वेळ मारून नेली.

Raj Thackeray
Abhimanyu Pawar: आमदार अभिमन्यू पवार यांना का आली दिवंगत मेटे, फुंडकरांची आठवण..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com