Video Maratha Reservation News : जरांगेंच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या तारख यांच्या तोंडाला काळे फासले..

Maratha Protest Dr Ramesh Tarakh Issue : जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवागगी देऊ नये अशी भूमिका घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात पुढाकार घेणारे डॉ. रमेश तारख यांना काही वेळापूर्वी झुंजार छावाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले.
Maratha Protest  Dr Ramesh Tarakh issue
Maratha Protest Dr Ramesh Tarakh issuesarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन अंतरवाली सराटी येथे 8 जून पासून उपोषण सुरू करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला काही गावकऱ्यांनी विरोध केला होता. याचा राग मराठा समाज बांधवांच्या मनात होता, त्याचे पडसाद आज छत्रपती संभाजीनगर येथे उमटले.

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवागगी देऊ नये अशी भूमिका घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात पुढाकार घेणारे डॉ. रमेश तारख यांना काही वेळापूर्वी झुंजार छावाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले.

तारख यांना गाठत संतप्त कार्यकर्त्यांनी आधी गांधीगिरी करत त्यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार केला. त्यानंतर तोंडाला काळे फासले आणि जाब विचारला. त्यानंतर कार्यकर्ते तिथून निघून गेले. या घटनेने एकच खळबळ उडाली असून मराठा आंदोलकांनी (Maratha Reservation) आता आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे.

कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि त्या आधारे सगेसोयरे यांच्यासह मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीसाठी गेल्या नऊ महिन्यापासासून अंतरवाली सराटीसह राज्यभरात आंदोलन सुरू होते. डाॅ. रमेश तारख (Dr Ramesh Tarakh) हे मुळचे अंतरवाली येथील असून सध्या ते वडीगोद्री जवळील वस्तीवर असलेल्या शेतात वास्तव्याला असल्याचे समजते.

Maratha Protest  Dr Ramesh Tarakh issue
Video Jarange Vs Bhujbal : "गंजलेल्या तलवारींना धार लावून ठेवा", भुजबळांचं विधान; जरांगे-पाटील म्हणाले, "आम्हीही..."

तसेच छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे त्यांच्या स्वतःचा दवाखाना असून ते शहरात राहतात. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा बेमुदत उपोषणाची घोषणा केली आणि 8 जून पासून अंतरवालीत त्यांचे आंदोलन सुरू झाले.

त्याआधी अंतरवालीतील काही गावकऱ्यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे गावातील वातावरण खराब होत आहे, जातीयवाद वाढत असल्याचे कारण पुढे करत उपोषणाला परवानगी देऊ नये, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

Maratha Protest  Dr Ramesh Tarakh issue
Jarange Vs Vikhe : जरांगे-पाटलांनी राधाकृष्ण विखे-पाटलांना सुनावलं; म्हणाले, "तुमच्यामुळे..."

या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनासाठी डाॅ. रमेश तारख यांनी पुढाकार घेतल्याचे बोलले जाते. परंतु ग्रामपंचायतीने ठराव घेऊन जरांगे पाटील यांच्या उपोषणाला परवानगी दिली आणि ते सुरू झाले. सरकारच्या शिष्टमंडळाने एक महिन्याची मुदत मागून घेतल्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले होते.

दरम्यान, ओबीसी आरक्षण बचावची मागणी करत वडीगोद्री येथे प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी उपोषण सुरू केले होते. यातून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष टोकाला गेला. हाके-वाघमारे यांनी सरकारच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले असले तरी दोन समाजामध्ये दरी निर्माण झाली आहे.

Maratha Protest  Dr Ramesh Tarakh issue
Abdul Sattar - Sandipan Bhumre : भुमरे-सत्तार यांच्यात तिसरा कोण ? पालकमंत्री पदावरून टोलेबाजी..

डाॅ. रमेश तारख संभाजीनगरात असल्याची माहिती मिळताच झुंजार छावाच्या पाच-सहा कार्यकर्त्यांनी त्यांना गाठले आणि तोंडाला काळे फासत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध केल्याबद्दल जाब विचारला. विशेष म्हणजे गेल्या आठ महिन्यापासून डाॅ. तारख हे जरांगे यांच्या आंदोलनात सक्रिय होते. घटनेनंतर पोलिस सतर्क झाले असून या प्रकाराची चौकशी केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com