Maharashtra Politics : शिंदेंना चेकमेट करण्यासाठीच फडणवीसांनी दोन्ही ठाकरेंना एकत्र आणण्याचा प्लॅन केला, माजी खासदाराचा खळबळजनक दावा

Imtiaz Jaleel On MNS Shivsena UBT Alliance : दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले असून ते भविष्यात देखील अशीच युती ठेवणार की स्वतंत्र राहणार याबाबतची उत्सुकता अनेकांना लागली आहे. ठाकरे बंधुंची पुढील दिशा काय असेल ते उद्या कळेल, असं सूचक वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
Eknath Shinde, Uddhav Thackeray, Raj Thackeray, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Uddhav Thackeray, Raj Thackeray, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 04 Jul : मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते उद्या (ता. 05) विजयी मेळाव्याच्या निमित्ताने मुंबईत एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

त्यामुळे आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले असून ते भविष्यात देखील अशीच युती ठेवणार की स्वतंत्र राहणार याबाबतची उत्सुकता अनेकांना लागली आहे. ठाकरे बंधुंची पुढील दिशा काय असेल ते उद्या कळेल, असं सूचक वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

Eknath Shinde, Uddhav Thackeray, Raj Thackeray, Devendra Fadnavis
BJP vs Shiv Sena politics : 'काहीही म्हणा, देवेंद्रजींना वाटतंय की, दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये'; चंद्रकांत खैरेंनी टायमिंग साधलं

ठाकरे उद्या एकत्र येण्याआधीच एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. दोन्ही ठाकरेंना एकत्र आणण्याचा प्लॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून एकनाथ शिंदेंना चेकमेट करण्यासाठी त्यांनी ही एकी घडवून आणल्याचं जलील यांनी म्हटलं आहे.

इम्तियाज जलील नेमकं काय म्हणाले?

ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याच्या मुद्द्यावर बोलताना इम्तियाज जलील म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यासाठी ठाकरेंना सोडून जाऊ शकतात. तर ते उद्या कोणी ऑफर दिली तरी ते जाऊ शकतात.

त्यामुळे त्यांना चेकमेट करण्यासाठी फडणवीसांची ही चाल आहे. तसंच मुंबईत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर सर्वात जास्त फटका एकनाथ शिंदेंना बसेल, असंही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी भविष्यात ठाकरे बंधुंसोबत जाण्याबाबत सूचक वक्तव्य देखील केलं आहे.

Eknath Shinde, Uddhav Thackeray, Raj Thackeray, Devendra Fadnavis
Sanjay Raut : शिंदेंनी ‘जय गुजरात’ची गर्जना करताच राऊतांनी फडणवीसांकडे केली मोठी मागणी; म्हणाले, ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा...

तुम्ही शिवसेना आणि मनसेसोबत जाणार का? असा प्रश्न विचारला असता भाजपला हरवण्यासाठी आम्ही काहीही तडजोड करायला तयार आहोत. मराठी माणसाला जे हवं होतं ते होतं आहे. शिवाय आम्ही विरोधक असून मान्य करतो की शिवसेना ही मराठी माणसाची ताकद आहे, असंही जलील यावेळी म्हणाले. त्यामुळे आता जलील यांच्या दाव्यावर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com