Raj Thackeray : तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनाची पायरी चढले, कारणही खास

Raj Thackeray Visits Shiv Sena Bhavan : मनसेच्या स्थापनेनंर तब्बल 20 वर्षानंतर राज ठाकरे आज शिवसेना भवनात आले.
Raj Thackeray, Uddhav Thackeray
Raj Thackeray, Uddhav Thackeraysarkarama
Published on
Updated on

Raj Thackeray News : शिवसेनेची साथ सोडून मनसेची स्थापन करणाऱ्या राज ठाकरे तब्बल 20 वर्षानंतर आज दादरमधील शिवसेना भवनामध्ये आले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांच्यामध्ये युती झाली आहे.

ठाकरे बंधूंसह आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज शिवसेना भवनात संयुक्त पत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेसाठी राज ठाकरे शिवसेना भवनात आले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध केला जाणार आहे.

मुंबई माणसाला केंद्रस्थानी ठेऊन तयार करण्यात आलेल्या या जाहीरनाम्यात मुंबईच्या विकासाचे व्हिजन मांडण्यात आले आहे. शनिवारी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसमोर शिवसेना भवनात संयुक्त पणे मांडणी करत जाहीरनाम्यातील मुद्दे सांगितले होते.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Nashik municipal election : महापालिकेतील एबी फॉर्मच्या गोंधळाबाबत गिरीश महाजनांचे कानावर हात; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांशी बोलू...'

संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले होते की, ठाकरे बंधू आज पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. तसेच शाखा शाखांना दोन्ही बंधू भेट देणार आहे. दरम्यान, उद्या विक्रोळीमध्ये ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा होणार आहे.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
BJP AB Form Scam : एबी फॉर्म वाटप गोंधळाची चौकशी होणार, भाजपचा बडा नेता नाशिकमध्ये..कुणाची वाढली धडधड?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com