Raj Thackeray : पहिली ते पाचवी हिंदी भाषा आणूनच दाखवा...; राज ठाकरेंचा मीरा रोड इथून सरकारला निर्वाणीचा इशारा

Raj Thackeray Mira Road Speech: राज ठाकरे यांची मीरा रोड इथं जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. इथं घडलेल्या मारहाणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही सभा घेतली.
Raj Thackeray
Raj Thackeray
Published on
Updated on

Raj Thackeray Mira Road Speech: महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी भाषा आणूनच दाखवा, तुमचं दुकानचं नाही तर शाळाही बंद करु टाकू असा निर्वाणीचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे. मीरा रोड इथं आयोजित जाहीर सभेमध्ये ते बोलत होते.

Raj Thackeray
आमदार माजलेत... असं फडणवीस म्हणाले ते खरंच! जनता त्यांना जागा दाखवेलच

मीरा रोडवर मनसेच्या नव्या शाखेचं उद्घाटन तसंच मीरा-भाईंदर इथल्या मीरा रोडवर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून एका अमराठी दुकानदाराला झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी ही सभा घेतली. यावेळी त्यांनी भाषणाची सुरुवातच या घटनेच्या संदर्भानं केली. यावेळी त्यांनी म्हटलं की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं म्हणे, तिसरी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार. मी आत्ताच तुम्हाला सांगतो की, महाराष्ट्रात पहिली ते पाचवी तुम्ही हिंदी भाषा आणायचा प्रयत्न तर करुन बघा दुकानं नाही शाळाही बंद करेन. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदी भाषेसाठी भांडतोय? ज्या अमराठी शाळा आहेत तिथं तुम्ही मराठी सक्तीची करायची सोडून मराठी शाळांमध्ये हिंदी सक्तीची करताय! कोणाच्या दबावासाठी? कोण दबाव टाकतोय तुमच्यावर? हे यांचं पूर्वीपासूनच आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray: समुंदर मे 'डुबे डुबे' कर मारेंगे! राज ठाकरेंनी भाजप खासदाराला दिलं थेट चॅलेंज; म्हणाले, मुंबईत येऊन दाखव...

पू्वीपासूनच आहे यांचं सगळं, काँग्रेस असल्यापासूनच आहे हे सगळं. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला याचा जो लढा होता, इतका प्रचंड होता तो लढा. ही मुंबई महाराष्ट्रापासून बाजुला करण्याचा डाव होता. तो कोणाचा होता तर काही गुजराती व्यापाऱ्यांचा होता आणि काही नेत्यांचा होता. मी एकदा आचार्य अत्र्यांचं पुस्तक वाचत असताना मला धक्काच बसला. मुंबई महाराष्ट्राला मिळू नये हे पहिल्यांदा मुंबई महाराष्ट्राला देऊ नका हे वल्लभाई पटेल यांनी सांगितलं.

ज्यांना आम्ही लोहपुरुष म्हणून पाहात आलो, या देशाचे गृहमंत्री म्हणून आम्ही तुमच्याकडं आदरानं पाहात आलो. तुम्ही महाराष्ट्राला विरोध केला. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात आंदोलनं झाली तेव्हा हे मोरारजी देसाई यांनी अनेकांना गोळ्या घालून ठार मारलं होतं. त्यामुळं गेल्या अनेक वर्षांपासून यांचा मुंबईवर डोळा आहे. हे तुम्हाला चाचपडून बघत आहेत. हिंदी भाषा आणली तर मराठी माणूस पेटतोय का?

Raj Thackeray
BJP Politics: भाजपला हवीत 80 टक्के बूथवर 51 टक्क्यांपेक्षा अधिक मतं! कार्यकर्त्यांना दिलं नवं टार्गेट

हळू हळू करुन ही मुंबई ताब्यात घ्यायची आणि गुजरातला जोडायची हे यांचं स्वप्न आहे. जगातलं हे सत्य आहे की, तुमची भाषा मेली आणि पायाखालची जमीन गेली तर तुम्हाला जगात कोणीही विचारणार नाही. त्यासाठी तुमची भाषा टिकवणं आणि जमीन राखणं गरजेचं आहे. मुंबईत जर काही गोष्ट झाली तर ती देशभरात चालू ठेवतात हे हिंदी चॅनेलवाले. हे खरंतर सत्ताधाऱ्यांच्या चप्पलेखालची ढेकणं आहेत. आता थोड्यावेळानं हे सुरु होतील, राज ठाकरेने उगला जहरं. फक्त मुंबईत काही झालं तर हे कोणाच्या तरी सांगण्यावरुन किंवा द्वेषातून पेटून उठतात.

Raj Thackeray
BJP Politics: भाजपला हवीत 80 टक्के बूथवर 51 टक्क्यांपेक्षा अधिक मतं! कार्यकर्त्यांना दिलं नवं टार्गेट

गुजरातमधून बिहारींना हाकलून दिल्याचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला. याच्या बातम्या झाल्या नाहीत, पण मुंबईत एका मिठाईवाल्याच्या कानफाडीत बसल्यानंतर त्याची देशाची बातमी होते. म्हणजे देशात असं चित्र रंगवलं जातंय की, बघा मुंबई अमराठी लोकांना कशा पद्धतीनं मारत आहेत. देशात हे कसलं राजकारण सुरु आहे हे लक्षात घ्या. हिंदीला केवळ २०० वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेला अडीच ते तीन हजार वर्षांचा इतिहास आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com