Raj Thackeray News : ''...तोच उमदेपणा आघाडीनं कसबा,चिंचवड पोटनिवडणुकीत दाखवावा!''; राज ठाकरेंचं पत्र

Kasba, Chinchwad By Election : महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी...
Raj Thackeray News
Raj Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

MNS News : महाविकास आघाडीने कसबा, चिंचवड पोटनिवडणुका लढवणारच अशी भूमिका घेतली आहे. तर भाजपकडून दोन्ही जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामुळे या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध होणार नसल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. मात्र, याचदरम्यान पुन्हा एकदा कसबा, चिंचवड पोटनिवडणुका बिनविरोध होण्यासाठी जोरदार राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही ही कसबा, चिंचवड पोटनिवडणुका बिनविरोध होण्यासाठी सर्वपक्षांना पत्र लिहिलं आहे.

कसबा, चिंचवड पोटनिवडणुका जाहीर झाल्यानंतर भाजपनं सुरुवातीला बिनविरोध होण्यासाठी पावलं उचलली होती. मात्र, महाविकास आघाडीनं या निवडणुका लढविण्याची तयारी दाखविल्यामुळे भाजपनं आपल्या उमेदवारांची नावेही जाहीर केली आहे. तसेच मनसे देखील कसबा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता राज ठाकरें(Raj Thackeray) नी आता बिनविरोध होण्याची भूमिका घेतल्यामुळे मनसे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

राज ठाकरेंनी पत्रात अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस दिवंगत आमदार रमेश लटके ह्यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या. त्यावेळेस मी श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आव्हान केलं होतं. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली. आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा असंही ठाकरेंनी म्हणाले आहेत.

Raj Thackeray News
Malegaon News; दादा भुसे यांनी शिवतीर्थाचे भूमीपूजन केले मात्र काम नाही झाले!

राज ठाकरेंनी पत्रात काय लिहिलंय ?

महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांच नुकतंच दुःखद निधन झालं. ह्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिडणूका होत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून ह्या मताचा आहे की, जेंव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेंव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी.

कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एक प्रकारे, राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही असंही ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray News
Meghalaya Election 2023 : मेघालयात सत्ताधारी NPP कडून जाहीरनाम्यात युवकांना मोठं आश्वासन

अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच असं नाही. अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके ह्यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस मी श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आव्हान केलं होतं. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली.

आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वाना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात असं आवाहन राज ठाकरेंनी पत्राद्वारे केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com