Malegaon News; दादा भुसे यांनी शिवतीर्थाचे भूमीपूजन केले मात्र काम नाही झाले!

मालेगावच्या शिवतीर्थाचे सुशोभीकरण तत्काळ करण्यासाठी आम्ही मालेगावकर समितीने धरणे आंदोलन केले.
Social Workers agitation in Malegaon
Social Workers agitation in MalegaonSarkarnama
Published on
Updated on

मालेगाव : (Malegaon) तत्कालीन कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) वर्ष उलटले तरी सुशोभीकरणाचे (Beautification) काम सुरू झाले नाही. त्यामुळे येथील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा व शिवतीर्थ परिसराचे सुशोभीकरणाच्या मागणीसाठी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती व विविध सामाजिक संघटनांतर्फे शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले. (We Malegaonkar constructive strife committee agitaion In City)प्रशासनाने शिवतीर्थाचे भूमिपूजन करूनही काम सुरु न करता शिवप्रेमींचा अपमान केला आहे. सुशोभीकरण तत्काळ न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

Social Workers agitation in Malegaon
Satyajit Tambe News; सत्यजित तांबेंचा विजय, भाजपसाठी धडा!

प्रशासनाने शिवतीर्थाचे भूमिपूजन करूनही काम सुरु न करता शिवप्रेमींचा अपमान केला आहे. सुशोभीकरण तत्काळ न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

Social Workers agitation in Malegaon
Pune Congress News : ...म्हणून कसब्यातील १६ इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या; थोपटेंनी सांगितलं कारण

मालेगाव शहरवासीयांना हे काम कधी पुर्ण होणार याची उत्सुकता आहे. त्याबाबत प्रशासनाशी पत्रव्यावहार करण्यात आला. अनेकदा शासनाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यावर देखील काहीही प्रतिसाद मिळाला नाही. पालकमंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघातील कामाविषयी शासन उदासीन असेल तर अन्य कामांचे काय होणार, असा प्रश्न केला जात आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी याबाबत तातडीने लक्ष घालून कामाला सुरवात करण्याची अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली.

आंदोलनात शिवजयंती उत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले स्मारक कृती समिती, अखिल भारतीय मराठा महासंघ, सार्वजनिक नागरी सुविधा समिती, सार्वजनिक एकता मंच आदी सहभागी झाले होते. सहाय्यक आयुक्त सचिन महाले, शहर अभियंता कैलास बच्छाव यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारले. शिवतीर्थ सुशोभीकरणासाठी सर्व संघटना प्रतिनिधींची बैठक घेऊन आराखडा अंतिम करून शिवजयंती नंतर तत्काळ काम सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

आंदोलनात निखिल पवार, देवा पाटील, सुशांत कुलकर्णी, मदन गायकवाड, रामदास बोरसे, प्रा. अनिल निकम, जितेंद्र दिसले, भरत पाटील, कैलास तिसगे, गुलाब पगारे, शेखर पगार, क्रांती पाटील, कैलास शर्मा, आर.डी. निकम, डॉ. राजेंद्र ठाकरे, जयेश आहिरे, संजय काबरा, दीपक पाटील, सतीश कलंत्री आदी सहभागी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com