Ayodhya Ram Mandir: उद्याच्या सुटीवर न्यायालयाकडून शिक्कामोर्तब; याचिका फेटाळली...

Ram Temple consecration : न्यायाधीश जीएस कुलकर्णी आणि निला गोखले यांच्यासमोर ही सुनावणी झाली.
Eknath Shinde, Ram Temple
Eknath Shinde, Ram TempleSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra News: अयोध्येतील राम मंदिरामध्ये उद्या (सोमवारी) श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. केंद्र सरकारने या दिवशी अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. तर महाराष्ट्र सरकारनेही उद्या सार्वजनिक सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.

या सुट्टीला चार विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. विशेष खंडपीठाच्या न्यायाधीश जीएस कुलकर्णी आणि निला गोखले यांच्यासमोर ही सुनावणी झाली.

वेदांत अग्रवाल, शिवांगी अग्रवाल, सत्यजित साळवे, आणि खुशी बंगिया या विधी शाखेच्या चार विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली होती. राज्य सरकारने स्वतःला कोणत्याही धर्माशी जोडू नये किंवा कोणत्याही एका धर्माला प्रोत्साहन देता कामा नये, असाही युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला होता. धार्मिक कार्यक्रम साजरा करण्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करणे हे घटनेत समाविष्ट असलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारे आहे, असे त्यांचे म्हणणं होते.

छत्तीसगड, गोवा, ओडिशा, राजस्थान, आसाम, मध्य प्रदेश, हरियाणा या राज्यांत सार्वजनिक सुटी असणार आहे. तर केरळ, झारखंडमध्ये सुटीची मागणी करण्यात येत आहे. मात्र आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, तेलंगणा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, लडाख, लक्षद्वीप, पुद्दुचेरी येथे अद्याप सुटी जाहीर केलेली नाही.

अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि मंदिर लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहे. राज्य सरकारकडून सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आल्याने राज्यातील रामभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Edited by: Mangesh Mahale

Eknath Shinde, Ram Temple
BJP Election Politics: उमेदवारीच्या पारंपरिक निकषांना छेद देण्यात भाजप यशस्वी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com