Neelam Gorhe : ठाकरे गटाच्या किरकोळ चुकीनं गोऱ्हेंना तारलं; वर्षभरासाठी 'उपसभापती'पद सेफ झालं!

Neelam Gorhe : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यावर आणलेला अविश्वास ठराव फेटाळून लावण्यात आला.
Neelam Gorhe
Neelam GorheSarkarnama
Published on
Updated on

Neelam Gorhe : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यावर आणलेला अविश्वास ठराव फेटाळून लावण्यात आला. सभापती राम शिंदे यांनी तांत्रिक बाबींवर बोट ठेवून हा ठराव फेटाळून लावला. त्यामुळे गोऱ्हे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी गोऱ्हे यांनी केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले होते. निवडणुकीच्या तिकिटासाठी ठाकरेंना मर्सिडीज द्यावी लागत होती, या गोन्हे यांच्या विधानाने खळबळ उडाली होती.

Neelam Gorhe
Harshwardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला ललकारलं; म्हणाले, 'महायुती सरकार औरंगजेबाच्या विचारांचं'

गोऱ्हे यांच्या या विधानावर संतापलेल्या महाविकास आघाडीकडून 4 मार्च रोजी अविश्वास प्रस्ताव विधिमंडळ सचिवांकडे सादर केला होता. या प्रस्तावावर दहापेक्षा अधिक सदस्यांच्या सह्याही होत्या. गोन्हे यांनी सभागृहाचा विश्वास गमावल्याने त्यांना उपसभापतीपदावरून हटवावे अशी मागणी या प्रस्तावाद्वारे केली होती.

पण सभापती शिंदे यांनी विधिमंडळाचे अधिनियम, कायदेशीर बाबींवर बोट ठेवले. ठराव 14 दिवसांपूर्वी सादर करणे अपेक्षित असते. त्यामुळे हा ठरावअधिनियमाच्या कक्षेत बसत नाही, असे सांगून त्यांनी तो तांत्रिक मुद्द्याच्या आधारे फेटाळला. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी सभापतींवर संताप व्यक्त केला.

Neelam Gorhe
Pune Congress : काँग्रेसला खिंडार! पुण्यात राजीनामा सत्र सुरूच, बड्या नेत्यांसह 100 जण राष्ट्रवादीच्या वाटेवर

यावेळी परब यांनीही विधिमंडळाच्या अधिनियमांवर बोट ठेवले. आम्ही ठराव सादर करताना कायदेशीर प्रकिया पूर्ण केली आहे. त्यामुळे 14 दिवसानंतर तो चर्चेला आणावा, अशी विनंती केली. पण सभापतींनी तांत्रिक बाबीच्या आधारे तो फेटाळून लावला.

एका वर्षासाठी आमदारकीचे टेन्शन मिटले :

हा अविश्वास ठराव फेटाळला गेल्याने आता पुढचे एक वर्ष गोऱ्हे यांचे उपसभापतीपद फिक्स झाले आहे. उपसभापतींवर अविश्वास ठराव आणल्यानंतर आणि तो फेटाळला गेला किंवा नामंजूर झाला तर पुढील एक वर्ष असा ठराव आणता येत नाही असा नियम आहे.

यापूर्वी गोऱ्हे यांच्याविरोधात भाजपच्या (BJP) प्रविण दरेकर यांनी अविश्वास ठराव आणला होता. त्यावेळी त्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात होत्या. त्यानंतर गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश करत एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. या पक्षप्रवेशानंतर भाजपने गोऱ्हेंविरोधातील अविश्वास ठराव मागे घेतला. त्यानंतर दरेकर यांनीच गोऱ्हे यांच्याबद्दलचा विश्वासदर्शक ठराव आणला आणि सभागृहात मान्यही झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com