Ramdas Athavle : शिर्डीच्या जागेसाठी मोदींची भेट घेणार ! 

Lok Sabha Election 2024 : रामदास आठवले यांना हव्यात लोकसभेच्या दोन जागा  
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News  : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपाबाबत वरिष्ठ नेत्यांमध्ये खल सुरू असतानाच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही दोन जागांवर दावा केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला दोन जागा मिळाव्यात, असे आठवले यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे. या वेळी आठवले यांनी शिर्डीतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी गरज पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांची चर्चा सुरू केली आहे. त्यांनी एका मुलाखतीत महाराष्ट्रात भाजप 26 जागा लढवणार असल्याचे सांगितले आहे. तसेच राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे)  हे 22 जागा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, या साऱ्या वाटाघाटीत रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाला लोकसभेच्या जागा मिळणार का ? याबाबत कोणीही सूतोवाच केले नाही. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ramdas Athawale
Shiv Sena MLA Disqualification : आता शिंदे गटाच्या आमदारांची उलट तपासणी ... 

मी हरलो होतो...  पण तिथूनच लढेल  

"त्यामुळे आता आठवले यांनी स्वतः महाराष्ट्राच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी गरज पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही बोलणार असल्याचे आठवले म्हणाले. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी आपले मत मांडले, आठवले म्हणाले, "मी महाराष्ट्रातील शिर्डीमधून 2009 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. मी हरलो होतो, पण आता पुढची लोकसभा निवडणूक शिर्डीतून लढवायची आहे. याबाबत आपले भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी बोलणे झाले असून, गरज पडल्यास अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही बोलू, असे आठवले यांनी सांगितले." 

तामिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण 

"मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारचा वाद होणे योग्य नाही. तामिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला महाराष्ट्रातही स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करून आरक्षण देता येईल. मराठा समाजातील गरीब लोकांना न्याय मिळाला पाहिजे, परंतु ते करताना इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) नुकसान होऊ नये, असे ते म्हणाले."

Ramdas Athawale
Shambhuraj Desai : राष्ट्रवादीला झटका, पाटणकर गटाला सोडचिठ्ठी देत कार्यकर्त्यांचा देसाई गटात प्रवेश 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com