Student Maharashtra : शिक्षिकेकडून छळ? 10thच्या विद्यार्थिनीनं संपवलं आयुष्य; नरेश म्हस्के, आंबेडकरानंतर केंद्रीय मंत्री पोहोचले पीडिताच्या घरी

Ramdas Athawale Meets Family of 10th Student Who Died by Suicide After Teacher Insult in Airoli Navi Mumbai : नवी मुंबईतील ऐरोलीतील एका खासगी शाळेतील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं गळफास घेतलेल्या प्रकरणाला वेगळं वळण लागल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
Student Suicide Maharashtra
Student Suicide MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Education News: नवी मुंबईतील ऐरोली इथल्या श्रीमती सुशीलादेवी देशमुख विद्यालयात दहावीत शिकणाऱ्या अनुष्का केवळे (वय 16) हिनं गळफास घेऊन मृत्यूप्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकेविरोधात पोलिसांनी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणात पूर्वीच गुन्हा दाखल आहे. आत्महत्येस प्रवृत्त केलं म्हणून, दाखल असलेल्या गुन्ह्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मयत विद्यार्थिनीच्या कुटुंबियांची भेट घेतली.

अनुष्का केवळे यांच्या कुटुंबियांची सांत्वन करताना, रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी, 'शिक्षकांकडून विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक छळ हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न आपण स्वत: करणार आहोत.' दोषींवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी यावेळी केली.

या घटनेची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) खासदार नरेश म्हस्के यांनी दखल घेत, अनुष्काच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त करत दिलासा दिला होता. पोलिस व शाळा प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने त्यांनी पोलिस आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात भेट देऊन सदर घटनेची चौकशी करून ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी दोन दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन दिलं.

Student Suicide Maharashtra
Shivsena UBT : मुंबई-पुणे जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मोहरे हेरले : 5 नेत्यांवर महत्वाची जबाबदारी

खासदार म्हस्केंचा इशारा

खासदार म्हस्के यांनी शाळा व्यवस्थापनाला निवेदन देऊन संबंधित शिक्षिकेचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी केली असून, विद्यार्थ्यांच्या मानसिक सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना राबवण्याची सूचना केली आहे. दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आवाज उठवत राहण्याची ग्वाही त्यांनी पालकांना दिली आहे.

Student Suicide Maharashtra
Scholarship : 15 हजार 400 'US डॉलर' शिष्यवृत्ती हवी आहे का? सरकारची ही योजना समजावून घ्या!

कायदेशीर मदतीचं आश्वासन

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी देखील मयत अनुष्काच्या कुटुंबियांची तातडीने भेट घेत सांत्वन केले. वाशी इथं दौऱ्यावर असताना, त्यांनी ही भेट घेतली. अनुष्काच्या कुटुंबाची विचारपूस केली. वस्तूस्थिती समजावून घेत, कायदेशीर मदतीचं आश्वासन आंबेडकर यांनी अनुष्काच्या कुटुंबाला दिलं.

नेमकी घटना काय?

सराव परीक्षा काळात अनुष्काच्या बेंचखाली चिठ्ठी सापडली. शिक्षिकेने कोणतीही खात्री न करता तिच्यावर कॉपी करत असल्याचा आरोप करत, अवमानकारक अन् जातीवाचक भाषा वापरली. तसंच, तिची संपूर्ण शाळेत बदनामी केली. हा अपमान सहन न झाल्याने अनुष्काने मानसिक तणावातून गळफास घेत आयुष्य संपवलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com