Mumbai News : लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेच्या वर्धापन दिनी दोन ठिकाणी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत आहे. '19 जून 1966 रोजी दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा बुधवारी(ता. 19)58 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेचा मेळावा षण्मुखानंद येथे होत असून शिंदे गटाचा मेळावा वरळी डोम येथे पार पडत आहे. या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेहमीच्या स्टाइलमध्ये तुफानी भाषण करत शिवसैनिकांमध्ये हुंकार भरला.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 58 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मोदी शाह, शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, लोकसभेत यश माझ्यामुळे आले असे मी कधीच म्हणार नाही. मी शून्य आहे, यशाचे धनी तुम्ही आहात.मला शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं होतं,आत्मविश्वास असेल तर जगाच्या कोपऱ्यात कुठे जा, तुला कोणी रोखू शकत नाही. पण आत्मविश्वास आणि अहंकार यामध्ये फरक आहे. अहंकार जो मोदीमध्ये आहे असेही त्यांनी सांगितलं.
स्वत:चं अपयश झाकण्यासाठी उद्धव ठाकरे एनडीएसोबत जाणार असल्याची अफवा पसरवली जातेय..
दुसरी चर्चा छगन भुजबळ आमच्या संपर्कात,अरे पण ते आमच्याशी बोलले का, मी त्यांच्याशी बोललो का, कशासाठी या हे पसरवण्यात येतंय.
शिवसेनेला देशभक्तांची मतं मिळाली.
नरेंद्र मोदींनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं.
चंद्राबाबू, नितीशकुमार हे हिंदुत्ववादी आहेत का..?
लोकशाही वाचवण्यासाठी आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे.
सत्तेचा दुरुपयोग हा भाजपचा नक्षलवाद...
शिवसेनाप्रमुखांचा फोटो न लावता विधानसभा निवडणुका लढवून दाखवा.
भाजपसोबत कधीच जाणार नाही.
काही लोकांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून 'बिनशर्ट' पाठिंबा दिला.उघड पाठिंबा नको म्हणून बिनशर्ट, राज ठाकरेंना टोला
महाराष्ट्रातली निवडणूक सात नाही 10 टप्प्यांत घ्यायला हव्या होत्या.रोज त्यांची सालटी काढली असती.
मी पुन्हा येईन म्हणणारे आता जाऊ द्या ना घरी म्हणत आहेत, फडणवीसांना चिमटा
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.