Rape Case : बलात्कारी ऋषिकेश वैद्यची भाजप महिला पदाधिकाऱ्याकडून पाठराखण, म्हणाल्या, 'धर्माची बदनामी...'

Rishikesh Vaidya Arrested BJP : पुण्यातील महिलेवर अत्याचार करणाऱ्या वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यला पोलिसांनी पिंपरीतून अटक केली आहे.
Rishikesh Vaidya Arrested:
Rishikesh Vaidya Arrested:Sarkarnama
Published on
Updated on

Rishikesh Vaidya Arrested : पुण्यातील महिलेवर अत्याचार करणाऱ्या वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यला पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियातून महिलेशी संपर्क साधून आधात्माच्या नावाखाली वैद्यने महिलेवर अत्याचार केला होता. अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर महिलेने हिमतीने या विषयी आपल्या पतीला सांगितले. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी वसईच्या माणिकपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी हे प्रकरण हडपसर पोलिसांकडे वर्ग केले होते. पोलिसांनी ऋषिकेश वैद्यला पिंपरीमधून अटक केले. दरम्यान, मुंबईतील भाजपच्या महिला पदाधिकारी अक्षता तेंडूलकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सर्वच चॅनेल्सवर ऋषिकेश वैद्य गुरुजींबद्दल अपप्रचार सुरू असल्याचे दिसत आहे, असे म्हणत त्याची पाठराखण केली.

त्या म्हणाल्या, '2024 मध्ये नेमकं काय घडलं, याबाबत ठोस पुरावे समोर आलेले नसताना अशा प्रकारे कोणाचीही बदनामी करणे योग्य नाही. जर पीडित महिलेने सांगितल्याप्रमाणे काही घडलं असेल, तर त्याची सखोल चौकशी व्हायलाच हवी आणि ते सिद्ध झाल्यास संबंधितांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.',

Rishikesh Vaidya Arrested:
Rishikesh Vaidya Arrested: खरातनंतर आणखी एका भोंदूबाबाला अटक, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

'केवळ ऐकीव किंवा अपूर्ण माहितीच्या आधारावर कोणावरही आरोप करणे, किंवा माध्यमांमधून त्यांची प्रतिमा खराब करणे चुकीचे आहे. अशा गोष्टींमुळे केवळ एका व्यक्तीची नव्हे, तर आपल्या समाजाची आणि धर्माचीही बदनामी होते.', असे देखील त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Rishikesh Vaidya Arrested:
Ashok Kharat Video : अशोक खरातचे व्हिडिओ बाहेर कसे आले? "ऑफिस बाॅयच्या बायकोचा..."; पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा मोठा खुलासा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com