Ashok Kharat Video : अशोक खरातचे व्हिडिओ बाहेर कसे आले? "ऑफिस बाॅयच्या बायकोचा..."; पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा मोठा खुलासा

Sandeep Karnik on Ashok Kharat Video : 'अशोक खरात प्रकरणातील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या फेसबूक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरच्या 65 खात्यांवर गुन्हा दाखल केले आहेत. तसंच अनेकजण एखाद्या महिलेचा चेहरा मॉर्फ करूनही हे व्हिडिओ व्हायरल करत आहेत.'
Nashik Police Commissioner Sandeep Karnik on Ashok kharat Video
Nashik Police Commissioner Sandeep Karnik addressing the media about the Ashok Kharat case and the viral video investigation.Sarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat Viral Video Case : ज्योतिष सांगण्याच्या नावाखाली अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातला नाशिक पोलासांनी अटक केली आणि संपूर्ण राज्यभरातच एकच खळबळ उडाली. तर पोलिसांनी या प्रकरणाची माहिती नेमकी कशी मिळाली? आणि त्याच्या अटकेनंतर खरातने महिलांवर अत्याचार केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल कसे झाले? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

याच सर्व प्रश्नांची उत्तरे आता नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कर्णिक यांनी या प्रकरणातील जे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ते बाहेर कसे आले? याचा खुलासा केला. आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितलं की, पोलिसांकडे असलेल्या व्हिडिओतील एकही व्हिडीओ बाहेर आलेला नाही.

मात्र, अशोक खरातच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या ऑफिस बॉयने हे व्हिडीओ काढले होते. त्याच्या माध्यमातून हे व्हिडीओ व्हायरल झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच यावेळी त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला. ते म्हणाले, 'तो खरातने त्याच्या ऑफिस बॉयच्या 7 महिने गर्भवती असलेल्या पत्नीचा विनयभंग केल्यामुळे ऑफिस बॉय खरातच्या विरोधात गेला आणि त्याने काही व्हिडीओ रेकॉर्ड केले. त्याने हे रेकॉर्ड केलेले व्हिडीओ वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले होते.

खरात दबाव आणत होता. त्याला आणि त्याच्या पत्नी, मुलांना मारण्याची धमकी खरातने दिली होती. त्यामुळे जीवाच्या भीतीने ऑफिस बॉयने आपल्या विश्वासू लोकांकडे हे व्हिडिओ ठेवले होते. शिवाय त्याने त्यांना असंही सांगितलं होतं की, 'जर माझ्या जीवाला काही बरं-वाईट झालं तर तुम्ही हे व्हिडीओ बाहेर काढा. जेणेकरून हे प्रकरण दबलं जाणार नाही.'

Nashik Police Commissioner Sandeep Karnik on Ashok kharat Video
Ashok Kharat : माजी खासदाराला खरातची काळी जादू पडली 'महागात'; ठाकरेंची साथ सोडताच झाले पराभवाचे धनी!

त्यामुळे हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर ऑफिस बॉयने ज्यांच्याकडे व्हिडिओ दिले होते त्यांनी ते व्हायरल केल्याचं कर्णिक यांनी सांगितलं'. तर या प्रकरणातील एकही व्हिडीओ पोलिसांनी बाहेर आणला नसल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, खरात प्रकरणातील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या फेसबूक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरच्या 65 खात्यांवर गुन्हा दाखल केले आहेत.

Nashik Police Commissioner Sandeep Karnik on Ashok kharat Video
Ashok Kharat News: कॅप्टन खरातचा मुखवटा टराटरा फाटणार! तपासाची जबाबदारी धडाकेबाज IPS अधिकाऱ्याकडे!

तसंच अनेकजण एखाद्या महिलेचा चेहरा मॉर्फ करूनही हे व्हिडिओ व्हायरल करत आहेत. ज्यामध्ये काही एआय जनरेटेड आणि प्रकरणाशी संबंध नसलेल्या महिलांचे व्हिडीओ देखील असून या प्रकरणी नगरमध्ये गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे असले विकृत प्रकार पोलीस खपवून घेणार नाहीत, असा इशारा देखील कर्णिक यांनी यावेळी दिला आहे.

Nashik Police Commissioner Sandeep Karnik on Ashok kharat Video
Rishikesh Vaidya Arrested: खरातनंतर आणखी एका भोंदूबाबाला अटक, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com