Ravindar Waikar In Shiv Sena : लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता महत्त्वाची; शिंदेंच्या उपस्थितीत वायकर म्हणाले...

Ravindar Waikar News : सत्तेत येऊन हा प्रश्न सोडवणे, लोकांना न्याय देणारे ठरेल....
Ravindar Waikar In Shiv Sena
Ravindar Waikar In Shiv Sena Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आमदार रवींद्र वायकर यांनी ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मागील अनेक दिवसांपासून वायकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. आज अखेर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल होत शिंदेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेते प्रवेश केला आहे. (Latest Marathi News)

Ravindar Waikar In Shiv Sena
NCP Politics : अजितदादा म्हणतात आम्ही पुन्हा कधीही एकत्र येणार नाही; तर सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'आमच्यातील मतभेद हे...'

यावेळी वायकर म्हणाले, "गेली 50 वर्षे मी शिवसेनेते काम केले आहे. 1974 पहिली जोगोश्वरीची दंगल, त्या वेळेपासून मी बाळासाहेबांसोबत आहे. शिवसेनेचे काम करत आलो आहे. आज शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्याच्या मागचं कारण वेगळं आहे. विकास कामं, रस्त्यांची कामं, पाण्याचे कामं रखडलं आहे. अशा वेळी धोरणात्मक निर्णय लोकांसाठी बदलणं गरजेचं असतं. असं झालं नाही तर लोकांनी न्याय देऊ शकणार नाही."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ravindar Waikar In Shiv Sena
BJP News : महिला आरक्षण आल्यावर उत्तम जानकर साडी घालून उमेदवारी मागतील; लक्ष्मण ढोबळेंचा टोला

"मतदारसंघात अनेक मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. त्याबाबत काम होणं हा मोठा प्रश्न आहे. म्हाडाचा प्रश्न आहे. असे धोरणात्मक निर्णय सत्तेत असल्याशिवाय होणार नाही. जर आता सत्तेत येऊन हा प्रश्न सोडवणे, लोकांना न्याय देणारे ठरेल. देशात आज पंतप्रधान मोदींची सत्ता आहे. राज्यात मुख्यमंत्री शिंदे चांगलं काम करत आहेत. माझ्या मतदारसंघातील कामांबाबत ते निर्णय घेतील," असे वायकर म्हणाले.

शिंदेंची ताकद वाढली -

रवींद्र वायकर (Ravindra Waikar) हे मागील अनेक दिवसांपासून वादात सापडले होते. तपास यंत्रणांच्या रडारवर वायकर होते. जोगेश्वरी पश्चिम उपनगर येथील ते आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाने एक मोठी ताकद एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) सोबतीला जोडली जाईल. गजानन किर्तीकर हे स्थानिक खासदार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने वायकरांसोबत काही स्थानिक नगरसेवक ही येण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com