BJP News : महिला आरक्षण आल्यावर उत्तम जानकर साडी घालून उमेदवारी मागतील; लक्ष्मण ढोबळेंचा टोला

Solapur Loksabha Election : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे. माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम जानकर यांनी सोलापुरातून लोकसभा लढविण्याची तयारी केली आहे. मात्र, जातीच्या दाखल्यावरून त्यांना भाजपमधूनच विरोध होताना दिसत आहे.
Uttam Jankar-Laxman Dhoble
Uttam Jankar-Laxman DhobleSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur News : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे. माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम जानकर यांनी सोलापुरातून लोकसभा लढविण्याची तयारी केली आहे. मात्र, जातीच्या दाखल्यावरून त्यांना भाजपमधूनच विरोध होताना दिसत आहे. माजी मंत्री तथा भाजपचे प्रवक्ते लक्ष्मण ढोबळे यांनीही जानकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आगामी काळात महिला धोरण आले तर उत्तम जानकर साडी नेसून येणार का, असा बोचरा सवालही त्यांनी जानकरांना केला.

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhoble) हे आज पंढरपूरच्या दौऱ्यावर हेाते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी जानकर यांच्या जातीच्या दाखल्याबाबत भाष्य केले. ते म्हणाले, केवळ राजकीय स्वार्थासाठी जातीचा दाखला बदलून जर कोणी उमेदवारी मागत असेल तर ते डीएनए अडचणीत आणणारे आहे. कारण नसताना जात बदलून सांगणे हे योग्य नाही. ते पै-पाहुण्यांमध्ये बेईज्जत करणारे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uttam Jankar-Laxman Dhoble
Nanded BJP : अशोक चव्हाण हे चिखलीकरांचा गेम करणार...? की पाठीशी उभे राहणार...?

उमेदवारीच्या अट्टाहासापायी उद्या महिला आरक्षणाचे धोरण आले. ते २०२६ मध्ये अस्तित्वात येणारच आहे, त्यामुळे देशातून १८१ महिला खासदार म्हणून निवडून येणार आहेत. त्या वेळी जात बदलणारे उत्तमराव जानकर (Uttam Jankar)यांचेसारखे अभ्यासू, विचारवंत आणि सर्वपक्षीयांशी संबंध असणाऱ्या नेतृत्वाला वाटलं तर ते म्हणणार की, महिला आरक्षण आहे, मी साडी घालून आलो आहे, मला मान्य करा. साडी घालून आलो की मी महिला झालो आहे, असे हे म्हणणार. हे घडू शकतं, असा दावा ढोबळे यांनी केला.

जातीचे बनावट दाखले काढण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः हिंदू खाटीक समाजाने तर चंगच बांधला आहे. अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत, ते काही योग्य नाही. सोलापूरमधील दलित चळवळीत काम करणाऱ्या काही लोकांनी आक्षेपही घेतला. मात्र, त्याचा त्यांना त्रास झाला. तिकिटासाठी जात बदलण्यापेक्षा त्यांनी कामाठीपुरीत राहायलाच जावं, हे जास्त चांगलं आहे, असा टोला ढोबळे यांनी लगावला.

Uttam Jankar-Laxman Dhoble
Solapur Politics : लोकसभेआधीच उडाला विधानसभेचा खटका; सोलापुरात कोठे-देशमुख समर्थकांत हाणामारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com