

Mumbai News: मुंबईतल्या पवई परिसरामध्ये गुरुवारी (ता.30) दुपारी राज्यात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. रोहित आर्य या व्यक्तिने आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी 17 लहान मुलांसह दोन प्रौढांना एका स्टुडिओमध्ये ओलीस ठेवले होते. यानंतर पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत रोहित आर्यचा एन्काऊंटर (Rohit Arya Encunter) करण्यात आला होता. आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.
माजी मंत्री व शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी रोहित आर्यबाबत धक्कादायक खुलासा केला होता. त्यांनी रोहित आर्यला आपण स्वत: चेकने पैसे दिल्याचा खुलासा केला होता. आता याचबाबत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून लवकरच माजी मंत्री केसरकर यांचा जबाब नोंदवणार आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना घटनेच्या दिवशी पोलिसांनी फोन करून रोहित आर्यशी बोलण्याची विनंती केली होती. मात्र, केसरकर यांनी त्यावेळी रोहित आर्यशी संवाद साधण्यास असहमती दर्शवली होती. पण त्यांनी केलेल्या दोन कोटींच्या दाव्यामुळे आता ते या प्रकरणाशी अप्रत्यक्षपणे जोडले गेले आहेत. त्यामुळे त्यांची बाजू समजून घेण्यासाठी आणि घटनेपूर्वी काय संवाद झाला होता, हे स्पष्ट करण्यासाठी पोलिस आता केसरकर यांचा अधिकृत जबाब नोंदवणार आहेत.
दीपक केसरकर यांनी रोहित आर्यबाबतच्या एन्काउंटरनंतर मोठा खुलासा केला होता. एन्काउंटर झालेल्या रोहित आर्यनं विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल केले होते. रोहित आर्यची स्वच्छता मॉनिटर म्हणून निवड झाली होती. शासनाकडून रितसर परवानगी दिली होती. परंतु, मधल्या काळात आर्यानं विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल केले होते. ते पैसे परत न दिल्याने त्याचे बिल थांबवण्यात आले. मुलांना ओलीस ठेवणं चुकीचं असल्याचं म्हटलं होतं.
तसेच आपण त्या खात्याचा मंत्री नाही, पण जर मी मुंबईत असतो तर जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो. मी पूर्वी त्याला धनादेश देऊन मदत केली होती. मात्र, चुकीचा पायंडा पाडणं योग्य नाही," असा गौप्यस्फोट माजी मंत्री दीपक केसरकर यांनी केला होता. त्यांनी रोहितने सरकारच्या एका मोहिमेत पैसे लावले होते. त्यापोटी त्यांनी त्यांच्या खिशातून पैसे दिले, आपण स्वत: चेकने पैसे दिल्याचा दावा केसरकर यांनी केला होता.
माहिती अधिकार कार्यकर्ते व आपचे नेते विजय कुंभार यांनी माजी मंत्री केसरकर यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांनी केसरकर यांच्या हेतूवर आणि भूमिकेवर शंका उपस्थिती केली होती.त्यांनी रोहित आर्यला केसरकरांनी त्यांच्या खिशातून पैसे दिल्याची गोष्ट शंका निर्माण करणारी आहे असल्याचा हल्लाबोल केला होता.
कोणताही मंत्री कंत्राटदाराला अशा प्रकारे पैसे देणार नाही. त्यामुळे या कृतीमागील हेतू आणि प्रशासनाची, विशेषतः आयएएस सुरज मांढरे यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी होणे गरजेचे आहे. केसरकरांनी स्वतः चेकद्वारे मदत केल्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे या व्यवहाराचा सखोल तपास आवश्यक आहे कारण सामान्य व्यवहारात अशी वैयक्तिक मदत संशयास्पद ठरते, असेही विजय कुंभार यांनी म्हटलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.