Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाला संघाशी संबंधित नेत्याचे नाव देण्याचा डाव, रोहित पवारांचा गंभीर आरोप

Rohit Pawar RSS BJP : नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. मात्र, आरएसएसशी संबंधित देण्याचे नाव देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केली आहे.
Navi Mumbai Airport
Navi Mumbai Airportsarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar News : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. या विमानतळाला भूमिपुत्र दि बा पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, पंतप्रधानांनी आपल्या भाषणात विमानतळाच्या नावाबाबत कुठलाही उल्लेख केला नाही. त्यामुळे या विमानतळाला दिबांचे नाव मिळणार की नाही, याची चर्चा आहे. दरम्यान, या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केला आहे.

रोहित पवार यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत म्हटले आहे की, 'संघाची शताब्दी असल्याने विमानतळाला संघाशी संबंधित नेत्याचं नाव देण्याचा भाजप व संघाचा मानस असल्यानेच उद्घाटन समारंभ उजाडला तरी स्व. दि. बा. पाटील साहेबांचं नाव देण्याचा निर्णय प्रलंबित ठेवला गेल्याचं जाणकारांकडून सांगितलं जातंय. पण भाजपने कितीही जोर लावला तरी स्थानिक भूमिपुत्र भाजपचा हा डाव उलथून टाकतील, यात कुठलीही शंका नाही.'

'पंतप्रधान मोदीसाहेबांनी आपल्या गोवा विमानतळाच्या भाषणातच गोवा विमानतळसाठी स्व. मनोहर पर्रिकर साहेबांचं नाव दिलं होतं आणि तो अतिशय योग्य निर्णय होता. एवढी ताकद पंतप्रधान साहेबांकडे असते, परंतु काल नवी मुंबईच्या विमानतळाला स्व. दि. बा. पाटील साहेबांचं नाव देण्याबाबत कसलाही उल्लेख पंतप्रधान साहेबांनी आपल्या भाषणात केला नाही, याचं आश्चर्य वाटतं.', असे देखील ते म्हणाले.

Navi Mumbai Airport
Ayush Prasad : भाजपत या..गिरीश महाजनांनी ऑफर दिली होती? जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलं काय ते..

हिवाळी अधिवेशन फक्त 10 दिवसांचे?

रोहित पवार यांनी आगामी हिवाळी अधिवेशन हे केवळ दहा दिवसांचे घेण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचा दावा केला आहे. त्यांनी म्हटले की, शेतकरी अडचणीत आहेत. आरक्षणाचे विषय, कोलमडलेली अर्थव्यवस्था, वाढता भ्रष्टाचार आणि एकूणच निर्माण झालेली अराजकता या परिस्थितीत हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवड्यांचं होणं गरजेचं आहे. कोरोना काळात केंद्राच्या सूचना, सर्वत्र भीतीचे वातावरण, कोरोना प्रसाराची भीती या पार्श्वभूमीवर जास्त दिवस अधिवेशन घेता येत नव्हतं. त्या काळात जास्त दिवसांचं अधिवेशन घेण्याची मागणी करणारे देवेंद्र फडणवीस साहेब आज गप्प का? सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची दानत तर दाखवली नाही, आता किमान तीन आठवड्यांचं अधिवेशन घेण्याची हिंमत तरी दाखवावी.

Navi Mumbai Airport
Shiv Sena symbol dispute: शिवसेना कुणाची? आता कोर्टानं ठाकरेंच्या विरोधात निकाल दिला तरी चालेल..; कारणं पुढे येतील...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com