Barshi News : महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात नेहमीच ‘काँटे की टक्कर’ असते. तुल्यबळ नेते कायमच एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसून येत नाही. तसेच ते प्रतिस्पर्ध्यांना कायमच आव्हान देण्याची भाषाही करत असतात. त्यात बार्शीत आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांच्यात कायमच तुल्यबळ लढाई सुरू असते. याचदरम्यान,बार्शीच्या राजकारणातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलचे बार्शी तालुकाध्यक्ष शांताराम जाधवर यांची गाडी जाळण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी (ता.31) ट्विट करत या आक्रमक भूमिका घेतली आहे.
तालुकाध्यक्ष शांताराम जाधवर यांना महिन्याभरापूर्वीच घाणेरडी शिवीगाळ करण्यात आल्याचा गंभीर आरोपही रोहित पवारांनी यावेळी केला आहे. 'जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही', असा हल्लाबोल बार्शी तालुक्यात घडलेल्या ट्विटमध्ये केला आहे.
रोहित पवार (Rohit Pawar) ट्विटमध्ये म्हणतात, 'जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही' ही म्हण बार्शी तालुक्यात तंतोतंत लागू होतेय. विधानसभेत पराभूत झालेले बार्शीचे माजी आमदारपुत्र रणवीर राऊत यांनी केवळ राजकीय द्वेषातून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाच्या ओबीसी सेलचे बार्शी तालुकाध्यक्ष शांताराम जाधवर यांना शिवीगाळ केली. या शिव्या इतक्या घाणेरड्या की तो आवाज शेअरही करु शकत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
या घटनेला महिना उलटत नाही तोच रात्री त्यांची गाडी जाळून टाकण्याचा गंभीर प्रकार घडला. ही गाडी कुणी आणि का जाळली, याचं उत्तर राज्याचं गृहखातं देणार आहे का? असा सवालही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी सांगितलं.
ते पुढे ट्विटमध्ये म्हणतात, जाधवर कुटुंबाची आज गाडी जाळली उद्या घर जाळल्यानंतर आणि घरातील व्यक्तींचा बळी गेल्यानंतर गृहखात्याला जाग येणार आहे का? की पोलिस दुसरा संतोष देशमुख होण्याची वाट पाहत आहेत? उद्या जाधवर कुटुंबाला काही झालं तर याची संपूर्ण जबाबदारी ही सरकार आणि पोलीस प्रशासनाची राहील.मुख्यमंत्री महोदय याकडं गांभीर्याने लक्ष द्या, अशी विनंतीही आमदार रोहित पवारांनी ट्विटद्वारे केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत राजेंद्र राऊत यांनी दिलेल्या कडव्या लढतीनंतर माजी मंत्री दिलीप सोपल यांनी विजय खेचून आणला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दिलीप सोपल यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या राजेंद्र राऊत यांचा 6 हजार 472 मतांनी पराभव करत विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे सोपल हे 7 व्यांदा आमदार बनून विधानसभेवर गेले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.