BVA News : विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीपर्यंत वसई-विरारमधील राजकारणात मोठा बदल घडला होता. बहुजन विकास आघाडीतून (बविआ) मोठ्या प्रमाणात आऊट गोईंग सुरू होते. अनेक शिलेदारांनी बविआची साथ सोडली होती. मात्र, महापालिका निवडणुकीत बविआने सत्ता मिळवत आपली ताकद दाखवून दिली.
महापालिकेत पुन्हा सत्ता मिळवणाऱ्या बविआला आताअच्छे दिन येत असल्याचे संकेत मिळत आहेत. बविआचे कार्यकर्ते. पदाधिकारी फोडणाऱ्या भाजप आणि शिवसेनेला बविआने धक्का देण्यास सुरुवात केली आहे.
रुचिता नाईक, वैभव पवार यांनी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच तीन नवीन रुग्णवाहिका लोकार्पण करत सोमवारी बविआमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात बविची ताकद अधिक भक्कम होणार आहे.
रुचिता नाईक म्हणाल्या, वसई-विरारचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता बहुजन विकास आघाडीत असल्याने रील बनवणारे नव्हे, तर प्रत्यक्ष काम करणारे नेते खरे रील स्टार असतात. नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून काम करणारे आमदार हितेंद्र ठाकूर , क्षितिज ठाकूर ,महापौर अजीव पाटील यांच्या कार्यपद्धतीचे रुचिता नाईक यांनी कौतुक केले.
याप्रसंगी स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी, अतुल साळुंखे, माजी नगरसेवक किशोर पाटील, युवा अध्यक्ष नवीन वाघचौडे, नवनाथ पगारे, अभिषेक हटकर, संजीव कदम, रोहन डिसोझा, राजेंद्र खुळे, रोहित डिसोझा, वैभव पवार, किशोर कारेकर, गणेश मुणगेकर, महेश निकम, जया गुप्ता आदी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.