Political pressure On Fadnavis : सत्ताधारी आमदार-खासदारही आझाद मैदानाच्या दिशेने : फडणवीस सरकारवरील दबाव प्रचंड वाढला

Azad Maidan demonstration News : आझाद मैदानावर जरांगे यांच्यासोबत खासदार, आमदार बसले आहेत. या दोन प्रमुख नेत्यांच्या सहभागामुळे आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे.
Maratha Reservation   Manoj Jarange Patil
Maratha Reservation Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी सकाळपासून मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला सर्वस्तरातून मोठा पाठींबा मिळत आहे. त्यांच्या आंदोलनात राज्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदार, खासदार त्यासोबतच केंद्रीय मंत्र्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यासोबतच आझाद मैदानावर जरांगे यांच्यासोबत काही काळ खासदार, आमदार बसले होते. या प्रमुख नेत्यांच्या सहभागामुळे आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे. त्यामुळे सरकारवरील दबाव वाढला असून ज्यामुळे येत्या काळात सरकारसमोरची परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.

मनोज जरांगे पाटील यांच्यासह आंदोलक शुक्रवारी सकाळपासूनच मुंबईत दाखल झाले. मनोज जरांगे हे आझाद मैदानावर आंदोलनास बसले आहेत. या आंदोलनामध्ये आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, अभिजीत पाटील, विजयसिंह पंडित या नेत्यांनी व्यासपीठावर येऊन आंदोलनाला पाठींबा दर्शवला आहे. आहेत. या नेत्यांनी उपोषणस्थळी जाऊन जरांगे पाटलांना पाठिंबा दिला. विशेष म्हणजे, त्यांनी केवळ पाठिंबा देऊन माघारी न जाता, जरांगे पाटलांसोबत उपोषणस्थळी काही काळ बसले होते. या घटनेमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आता आझाद मैदानाकडे वेधले आहे.

Maratha Reservation   Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : "तुम्ही जाम केलेली मुंबई दोन तासात मोकळी झाली पाहिजे..."; आझाद मैदानात पाय ठेवताच जरागेंचं मराठ्यांना आवाहन

त्यासोबतच त्यांच्या आंदोलनाला राज्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदार, खासदार त्यासोबतच केंद्रीय मंत्र्यांनी पाठिंबा दिला आहे. गेल्या दोन वर्षांपासून रस्त्यावर उतरून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणावरून आंदोलन करीत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे परभणीतील खासदार संजय जाधव यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा केली होती. त्यानंतर हिंगोलीतील खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांनी जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवत आंदोलनात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले होते.

Maratha Reservation   Manoj Jarange Patil
Manoj Jarange Vs Devendra Fadnavis Video : 'मराठे मांड्या घालून बसले, मला जेलमध्ये टाका तरी...', आझाद मैदानात येताच मनोज जरांगेंनी फडणवीसांना ललकारले

दरम्यान, या दोन खासदारांच्या सहभागामुळे आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे. यामुळे या आंदोलनात अधिक लोक सहभागी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे राज्य सरकारसमोरची परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. या सर्व घडामोडींमुळे, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना करणे भाग पडणार आहे, असे दिसून येते.

Maratha Reservation   Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil आझाद मैदानावर पोहोचले, सोबत लाखो मराठ्यांचा ताफा ।Mumbai News।

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला चार सत्ताधारी आमदारांनी पाठिंबा दिला आहे, त्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित, आमदार राजू नवघरे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विलास भुमरे या आमदारांचा समावेश आहे. तर विरोधी पक्षातील चार खासदार आणि दोन आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. विरोधी पक्षातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

Maratha Reservation   Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Agitation: अजित दादांच्या आमदार सरोज अहिरे म्हणाल्या, माझा जरांगेंना मनापासून पाठिंबा, खासदार भगरे थेट आझाद मैदानात!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com