शिवसेनेचं टेन्शन संपलं! अखेर समाजवादी पक्ष आला मदतीला धावून

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचं पारडं होऊ लागलं जड
CM Uddhav Thackeray
CM Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) महाविकास आघाडी विरुद्ध भाजप (BJP) असा सामना आहे. शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवारासमोर भाजपच्या उमेदवाराचे आव्हान आहे. यामुळं राजकीय गोळाबेरजेला गती आली आहे. समाजवादी पक्षानं (Samajwadi Party) पाठिंबा देण्यास सुरवातीला आढेवेढे घेतले होते. पण अखेर समाजवादी पक्षाने पाठिंबा दिल्यानं शिवसेनेचं टेन्शन दूर झालं आहे. (Rajya Sabha Election News Updates)

समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी हा पाठिंब्याचा निर्णय जाहीर केला. अबू आझमी म्हणाले की, अखिलेश यादवांचा मला फोन आला होता. त्यांनी आम्हाला महाविकास आघाडीला मत देण्यास सांगितलं आहे. त्यामुळं आम्ही महाविकास आघाडीला मत देणार आहोत. मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली असून, त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या आहेत. शिवसेना आणि भाजप सारखेच आहेत. आम्हाला एकाला निवडायचं आहे, त्यामुळं मी कोणाला निवडणार? देशात काय स्थिती आहे हे आपण पाहतोय त्यामुळे आम्ही शिवसेनेला निवडलं

CM Uddhav Thackeray
फडणवीसांनी एका 'ओएसडी'ला विधानसभेवर पाठवलं अन् दुसऱ्याला आता विधान परिषदेची लॉटरी

आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. तसेच, पाठिंब्याचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव घेणार असल्याचंही सांगितलं होतं. महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठकीला न जाण्याचा निर्णयही अबू आझमींनी घेतला होता. आझमी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोनही केला होता. पण, आझमी यांनी फोनला उत्तर दिले नव्हते. भाजप नेत्यांकडूनही आझमी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू होता. राज्यसभा निवडणुकीतील पाठिंब्याबाबत आझमींनी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याकडे बोट दाखवले होते. आमची अखिलेश यादवांशी चर्चा झाली असून, त्यांनी वेट अँड वॉचचे आदेश दिल्याचे आझमींनी म्हटलं होतं.

CM Uddhav Thackeray
पंकजा मुंडेंच्या नाराजीवर चंद्रकांतदादांनी दिलं पाण्यातल्या खड्ड्याचं उदाहरण

राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता भाजप 2 आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा सहजपणे जिंकता येणं शक्यत आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार तर भाजपकडून धनंजय महाडिक तर मैदानात उतरले आहेत. शिवसेनेला आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मित्रपक्षांसह अपक्षांची मदत लागणार आहे. यामुळं शिवसेनेची आक्रमक मोर्चेबांधणी सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलवर ठेवण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com